विदेश

अश्या प्रकारे हरणाच्या कळपाने व्यक्त केली कृतज्ञता 

Spread the love

                 प्राण्यांना मनुष्या सारखे बोलता येत नसले तरी त्यांना देखील भावना असतात. आणि ते व्यक्त देखील करतात. तसेही प्राण्यांना मनुष्यापेक्षा ईमानदार म्हटल्या जाते. अनेक वेळा आपले प्राण पणाला लावून प्राण्यांनी धन्याचे (मालकांचे) प्राण वाचविल्याचे अनेक प्रकरण पाहायला मिळतात. जीव वाचविणाऱ्या व्यक्तीबद्दल प्राण्यांचा कृतज्ञता व्यक्त करणारा असाच यरक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडीओच्या सुरुवातीला एक व्यक्ती असुरक्षित आणि एकटे असलेल्या हरणाच्या पाडसाला खड्ड्यातून काढताना दिसत आहे. दयाळू व्यक्ती या पाडसाला स्वतःच्या गाडीतून घेऊन गेली आणि त्याची काळजीपूर्वक तपासणी केली. तो व्यवस्थित आहे का याची तपासणी केल्यानंतर व्यक्तीने पाडसाला त्याच्या आईकडे जंगलात सुखरूप पोहचवले. पण, हे हरणाचे पाडस पुन्हा व्यक्तीच्या गाडीपाशी धावून आले आणि जमिनीवर नतमस्तक होऊन व्यक्तीचे आभार मानू लागले.

 

 

 

 

त्यानंतर या गोष्टीने आणखीन एक आनंदायी वळण घेतले. हरणाचे पाडस एक महिन्यानंतर पुन्हा एकदा व्यक्तीच्या दरवाजाबाहेर येऊन उभे राहिले. पण, यावेळी मात्र तो एकटा नव्हता तर त्या बरोबर त्याचे सर्व कुटुंब म्हणजेच हरणांचा एक कळप होता. हे सर्व कुटुंब व्यक्तीला धन्यवाद म्हणण्यासाठी गॅरेजमध्ये येऊन उभे होते ; जे पाहून तुम्हालाही नवल वाटल्याशिवाय राहणार नाही.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांच्या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच या व्हिडीओला ‘व्हिडीओचा शेवटचा भाग आश्चर्यचकीत करणारा आहे. जणू काही संपूर्ण कुटुंब कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी परत आले’ ; असे सुंदर कॅप्शन देण्यात आले आहे आणि सोशल मीडियावर या व्हिडीओची चर्चा होत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close