क्राइम

चिमुरडयाचे अपहरण करून अनैसर्गिक अत्याचार करत  हत्या 

Spread the love

पुणे / नवप्रहार मीडिया

                     आठ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याच्या हत्या करणाऱ्या आरोपीला  वाकड पोलिसांनी  बेड्या ठोकल्या आहेत.पवन पांडे असे आरोपीचे नाव आहे.  या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

शनिवारी रात्री हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचे अपहरण करण्यात आले होते. पुण्याच्या पाषाण परिसरात नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करून हत्या करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ वर्षीय अल्पवयीन मुलगा आणि पांडे ची तीन दिवसांपूर्वी ओळख झाली होती. पांडे हा रसवंती गृहात काम करायचा नुकतेच तीन दिवसांपासून त्याने काम सुरू केलं होतं. रसवंती समोर काही मुलं खेळण्यास यायचे. यात आठ वर्षीय हत्या झालेल्या मुलाचा देखील समावेश आहे. पांडे ने त्याच्याशी ओळख केली मग जवळीक साधली. रसवंतीगृह असल्याने अल्पवयीन मुलांना रस प्यायला द्यायचा. मुलगा आणि आरोपी यांच्यात ओळख वाढली. याचा फायदा घेऊन आरोपी पांडेने शनिवारी रात्री आठ च्या सुमारास अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याला पाषाण येथील परिसरात नेले. तिथं त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले मग त्याचा गळा दाबून हत्या केली.

मुलगा घरी आला नसल्याने त्याच्या पालकाने त्याचा शोध घेतला. मात्र, मुलगा सापडत नसल्याने त्यांनी पहाटेच्या सुमारास वाकड पोलीस ठाणे गाठून मुलगा हरवल्याची तक्रार दिली. आज रविवारी अल्पवयीन आठ वर्षीय मुलाची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. वाकड पोलिसांनी तपास सुरू केला. रसवंतीत कामाला असलेल्या पांडे ची चौकशी करण्यात आली. पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला. परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात आले. यात पांडे आणि अल्पवयीन मुलगा जात असल्याच आढळलं. अखेर या सर्व प्रकरणाचे बिंग फुटले आणि वाकड पोलिसांनी पांडेला बेड्या ठोकल्या आहेत.

पालकांनो आपल्या अल्पवयीन मुलांना एकट खेळण्यासाठी घराबाहेर पडू देऊ नका. घराच्या जवळ आणि तुमच्या नजरेसमोर ठेवा. जेणेकरून अशा अनोळखी आणि अमिश दाखवून मुलांना कोणी घेऊन जाणार नाही. मुलांना अनोळखी व्यक्तीकडून चॉकलेट किंवा इतर खायचा गोष्टी घ्यायच्या नाहीत हे शिकवण गरजेचं आहे. यातूनच अशा गंभीर घटना टाळू शकतो अस पोलिसांनी म्हटलं आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close