राजकिय

माजी जि. प. सभापती सौ. स्फुर्तीताई निखील गावंडे यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहिर प्रवेश.

Spread the love

 

श्रध्देय ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहिर प्रवेश

अकोला / पुर्णाजी खोडके

अकोला – श्रध्देय ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रहार जनशक्ती पक्षाच्या एकमेव माजी जि. प. सभापती तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सौ. स्फुर्तीताई निखील गावंडे यांनी वंचित बहुजन आघाडीत यशवंत भवन अकोला येथे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रध्देय ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहिर प्रवेश केला.
प्रहार जनशक्ती पक्षाच्या मोठ्या प्रमाणात अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आठवडाभरापुर्वा प्रदेश कार्यालय मुंबई येथे प्रवेश केला होता. यात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष निखील गावंडे यांनीही आपल्या सहकाऱ्यांनासह प्रवेश केला होता परंतु त्यांच्या पत्नी व प्रहार जनशक्ती पक्षाच्या एकमेव माजी जिल्हा परिषद सभापती तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सौ. स्फुर्तीताई निखील गावंडे यांचा प्रवेश झाला नव्हता. परंतु वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रध्देय ॲड बाळासाहेब आंबेडकर हे दोन दिवसांपासून अकोला दौऱ्यावर आले असताना आज त्याच्या यशवंत भवन अकोला या निवासस्थानी श्रध्देय ॲड बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेऊन सौ. स्फुर्तीताई निखील गावंडे यांनीज्ञश्रध्देय ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत जाहिर प्रवेश केला. ह्यावेळी टाकळी बु येथील सामाजिक कार्यकर्ते सुनिल वसु पाटील यांनीही आपल्या सहकाऱ्यांनासह प्रवेश केला. सौ. स्फुर्तीताई निखील गावंडे यांच्या प्रवेशाच्या निमित्ताने अकोला जिल्हा परिषदेत वंचित बहुजन आघाडीला आणखी बळ मिळाले आहे. या प्रवेशाच्या वेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलींद इंगळे, ओबीसी नेते ॲड संतोष राहाटे, जिल्हा परिषद अध्यक्ष सौ संगीताताई अढावू, माजी गटनेते गजानन गवई, सह जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विकास सदांशिव, तेल्हारा बाजार समितीचे सभापती सुनिल इंगळे, माजी जि. प. सदस्य गोपाल कोल्हे, अविनाश खंडारे, अकोट तालुकाध्यक्ष चरण इंगळे, तेल्हारा तालुकाध्यक्ष अशोक दारोकार, अकोला तालुकाध्यक्ष किशोर जामणिक, निखील गावंडे पाटील, तुषारभाऊ पाचपोर, संजयजी बुथ, टाकळी बु. चे मंगेश ताडे, तालुका संघटक सुरेंद्रभाऊ ओईंबे, युवा तालुका महासचिव निशांत राठोड, बंटी पाटील गावंडे, विशाल नागरे अमोल काळे, सिध्दार्थ पळसपगार आदी मान्यवर उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केल्यावर सौ. स्फुर्तीताई निखील गावंडे यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी अकोला जिल्ह्याच्या ओबीसी महिलांना वंचित बहुजन आघाडीशी जोडून येणाऱ्या निवडणुकीत महिला शक्तीच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचा संकल्प केला असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या प्रवेशामुळे प्रहार जनशक्ती पक्षाला मोठा हादरा बसला असुन अकोट व तेल्हारा तालुका हा पुर्णपणे वंचित बहुजन आघाडीच्या ताब्यात आला आहे….

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close