भारतीय सविधानाला अनुसरुनच प्रत्येक नागरिकाचे विचार व जिवनशैली असावी – प्रा.संदीप पांडेकर
शहरातील साईनगरात भारतीय संविधान दिनी जाहीर व्याख्यान सपन्न
दर्यापूर / तालुका प्रतिनिधी
सूरज देशमुख
भारतीय संविधानातील मुल्य जपणे हे आपले कर्तव्य असून भारतीय सविधानाला अनुसरुनच प्रत्येक नागरिकाचे विचार व जिवनशैली असावी असे प्रतिपादन सविधानाचे गाढे अभ्यासक प्रा.संदिप पांडेकर यांनी केले. शहरातील साईनगरस्थीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे संविधान दिनाच्या निमित्ताने जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून पांडेकर बोलत होते.
यावेळी वक्ते प्रा.ज्ञानेश्वर मेश्राम, कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश वानखडे तर प्रमुख पाहुणे म्हणून अँड. निशिकांत पाखरे, काँग्रेस शहराध्यक्ष आतिष शिरभाते,युवक काँग्रेस उपाध्यक्ष अमित गौडचोर, असलम मंसूरी यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच पूजन व हारअर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच सामुहिकपणे भारतीय संविधान उद्देशिका वाचन करण्यात आले. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानावर प्रा.ज्ञानेश्वर मेश्राम व उपस्थित मान्यवरांनी सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विनोद वानखडे,नीलेश वानखडे,
संजय डोंगरे, मंगेश अवचार,गजानन गावंडे,अजय खांडेकर,राहुल कुऱ्हाडे,मयुर मनोहरे,बाळा अभ्यंकर, चेतन रूपनारायण,अनिरुद्ध डोंगरे,विनोद गवई, अनिमेश मनोहरे,विशाल खंडारे,यश वसूकर,विशाल चौरंपगार,छकूला मनोहरे,विक्की वर्धे,अजित यादव, राजूभाऊ पूंडकर,गजानन नवरंगे,विजय पारे, सौरभ वानखडे,अजय शिरसाट,रुत्विक सोनोने,विकास आठवले,गौरव रायबोले,माजी सरपंच देवता वानखडे, सुजाता वानखडे,संजीवनी हंबर्डे,भावना गवई, शीला इंगळे, तपस्विनी अंभोरे,सूनिता गावंडे,प्रतिभा नेतनराव,आशा खंडारे,पदमा इंगळे,विमल अवचार आदींनी परीश्रम घेतलेत. यावेळी बहुसंख्येने साईनगर परिसर व शहरातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश वानखडे,संचालन गजानन गावंडे तर शेवटी आभार मंगेश अवचार यांनी मानले.