क्राइम
अभियंत्याच्या घरातील खिडकीतून पडत होती ५०० च्या नोटांचे बंडल

दक्षता विभागाचा घरावर छापा
दोन दिवसानंतर होणार होते सेवानिवृत्त
भुवनेश्वर / नवप्रहार ब्युरो
भुवनेश्वर रोडवेज विभागात मुख्य अभियंता असलेल्या अधिकाऱ्याच्या घरावर दक्षता विभागाने धाड टाकल्यानंतर या अधिकाऱ्याने घरात लपवलेली रोकड ज्यात ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल होते. खिडकीतून फेकण्याचा सुरवात केली. छापा टाकायला आलेल्या अधिकाऱ्यांनी त्या नोटा ताब्यात घेतल्या. बैकुंठनाथ सारंगी असे त्या अधिकाऱ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे हा अधिकारी दोन दिवसानंतर सेवानिवृत्त होणार होता.
या अभियंत्याशी संबंधित अनेक ठिकाणांवर ओडिशाच्या दक्षता विभागानं एकाचवेळी धाड टाकली. त्याच्या दोन घरांमध्ये २ कोटींपेक्षा अधिकची रोकड सापडली आहे. नोटा मोजण्यासाठी अधिकाऱ्यांनी मशीन नेल्या आहेत.
ओडिशाच्या दक्षता विभागानं शुक्रवारी भुवनेश्वर आणि अंगुलमध्ये छापे टाकले. एका सरकारी अधिकाऱ्याच्य घरातून २.१ कोटीपेक्षा अधिकची रोकड जप्त करण्यात आली. भुवनेश्वर रोडवेज विभागात मुख्य अभियंता असलेल्या बैकुंठनाथ सारंगी यांच्याशी संबंधित ठिकाणांवर दक्षता विभागानं एकाचवेळी धाडी टाकल्या. भुवनेश्वरमधील पीडीएन एक्झॉटिका इमारतीत सारंगी यांचा फ्लॅट आहे. या फ्लॅटमध्ये १ कोटी रुपये सापडले. तर
दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांना पाहताच सारंगी यांनी त्यांच्या फ्लॅटच्या खिडकीतून ५०० रुपयांच्या नोटांची बंडलं खाणी फेकली. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, दक्षता पथकातील कर्मचाऱ्यांनी खिडकीतून फेकलेल्या नोटा ताब्यात घेतल्या.
उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती गोळा केल्याप्रकरणी सारंगी यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. ओडिशा दक्षता विभागाचे ८ डीएसपी, १२ निरीक्षक, ६ एएसआय आणि अन्य कर्मचारी या कारवाईत सहभागी होते. भुवनेश्वर, अंगुल, पीपलीमधील सारंगी यांच्या ७ ठिकाणांवर एकाचवेळी छापे
टाकण्यात आले. अंगुलच्या विशेष दक्षता न्यायाधीशांनी सर्च वॉरंट जारी
केल्यानंतर या धाडी टाकण्यात आल्या.
विशेष म्हणजे बैकुंठनाथ सारंगी दोन दिवसांनंतर सेवानिवृत्त होणार होते. सारंगी यांच्या कार्यालयातही शोध मोहीम सुरु आहे. ही केवळ प्राथमिक कारवाई असून अद्याप छापेमारी संपलेली नाही, अशी माहिती दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
सारंगी यांच्या स्थावर आणि जंगम मालमत्तांचं मूल्यांकन केलं जात याच आधारावर पुढील कारवाई केली जाईल.
कुठे कुठे छापेमारी?
1. अंगुलच्या करदागडिया परिसरातील दुमजली घर
2. भुवनेश्वरच्या डुमडुमामधील पीडीएन एक्झॉटिकामधील फ्लॅट नं
C-102
3. पुरी जिल्ह्यातील पीपलीमधील सिऊलामधल फ्लॅट
4. अंगुलच्या शिक्षकपडामधील नातेवाईकाचं घर
5. अंगुलच्या लोकेपासी गावातील वडिलोपार्जित घर
6. अंगुलच्या मटियासाहीमधील दुमजली वडिलोपार्जित इमारत
7. भुवनेश्वरमधील मुख्य अभियंता, आरडी प्लानिंग एंड रोडमधील ऑफिस चेंबर