सामाजिक

निवारा सोशल फाउंडेशन आयोजित पर्यावरण संरक्षण व बालहक्क परिषद संपन्न…

Spread the love

यवतमाळ,18 डिसेंबर 2024: निवारा सोशल फाउंडेशन प्रा. लि.तर्फे आयोजित पर्यावरण संरक्षण व बालहक्क परिषद-2024 आज गणपती मंदिर,राऊत नगर,वाघापूर येथे उत्साहात पार पडली.या परिषदेच्या अध्यक्षस्थानी डॉ. संजय कांबळे होते,तर उद्घाटक म्हणून ओंकार सोनवणे यांनी उपस्थिती लावली.प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते सचिन मनवर यांनी मार्गदर्शन केले.तसेच नाना वानखेडे,प्रमोद फाळके, परिमल देशपांडे,प्रा.सुधीर कानतोडे,अरविंद वानखेडे,संजय नाटकर आणि ज्ञानेश्वर वानखेडे या मान्यवरांची उपस्थिती परिषदेला लाभली.कार्यक्रमाची सुरुवात निवारा फाउंडेशनचे संजय नाटकर यांनी पर्यावरणाचे महत्त्व स्पष्ट करत प्रास्ताविकातून केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.पंढरी पाठे यांनी उत्तम प्रकारे केले.परिषदेमध्ये जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.अनेक मान्यवरांनी पर्यावरण संरक्षण आणि बालहक्कांवरील विविध विषयांवर आपली मते व्यक्त केली.या परिषदेने उपस्थितांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती केली आणि बालहक्कांसाठी नवे दृष्टीकोन दिले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निवारा सोशल फॉउंडेशन च्या प्रशांत टेंगे,रूमेजा शेख,प्रेरणा पाल,आश्विन नेमाडे, शेख सर,मयुरी चुनारकर,दुर्गा पटले,सरीता निनावे,संजय निनावे,दर्शन चौधरी,साधना पवार,राहुल वानखेडे,सुष्मा भोयर,नितीन काळे,पुष्पलता नेमाडे,रंजना मेठे,यांनी प्रयत्न केले.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close