युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर यांच्या नेतृत्वात रुपेश मोरे यांचा प्रवेश
दर्यापूर – आम आदमी पार्टी चे दर्यापूर शहर सहसंयोजक रुपेश मोरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून युवासेना अमरावती जिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर यांच्या नेतृत्वात युवासेना मध्ये प्रवेश घेतला. त्यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जर कोनता पक्ष कोणत्याही कार्यकर्त्याला किंवा कोणत्याही कामाला न्याय देत असेल तर तो पक्ष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे मी आम आदमी पार्टी मध्ये खूप काम केले पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम करण्याची माझी पूर्वीपासूनच इच्छा होती त्या संदर्भात मी अंकुश पाटील कावडकर यांच्यासोबत संपर्क साधून पुढील राजकीय वाटचालीसाठी भविष्यासाठी चर्चा केली त्यात माझे समाधान होऊन मी आज सर्व समक्ष प्रवेश घेतला आहे त्यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर, ज्येष्ठ शिवसैनिक बबनराव विल्हेकर, सागर पाटील वडतकर, मनोज लोखंडे, भरत हिंगणीकर, नितीन माहुरे, पंकज राणे उपस्थित होते.