सामाजिक

मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे होणार 100 बेडचे अत्याधुनिक हॉस्पिटल. मंजूर

Spread the love

महेश डोंगरे यांच्या मागणीला यश

 आरोग्य मंत्री ना.तानाजीराव सावंत साहेब यांनी दिली मंजुरी.:

सिंदखेड राजा / प्रतिनिधी

मातृतीर्थ सिंदखेड राजा येथिल होणारा विकास पाहता स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ यांचं जन्मस्थळ असणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे पुर्वी 30 बेड चे जुने हॉस्पिटल होते, कुठल्याही आद्ययावत सोयी सुविधा नव्हत्या अशा वेळी दर वर्षी जिजाऊ जयंतीच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या मराठा सेवक महेश डोंगरे पाटील यांच्या निदर्शनास आले व त्यांनी सिंदखेड राजा येथिल रहिवाशांना मागील जिजाऊ जयंतीच्या दिनी शब्द दिला की, मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे येणाऱ्या काळात भव्य असं रुग्णालय उभे करण्यासाठी प्रयत्न करणार, आणि आज घडीला त्यांनी तो शब्द खरा करून दाखवत ना.तानाजी सावंत साहेबांच्या माध्यमातून 100 बेड हॉस्पिटलला अखेर मंजुरी मिळवली काहीच दिवसात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

मातृतीर्थ सिंदखेड राजा हे गाव मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर आहे आणि समृद्धी महामार्ग सुद्धा तेथून गेला असल्याने आणि दरवर्षी 12 जानेवारी ला अतिशय भव्य असा जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात येत असल्यामुळे अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. मग अशा ऐतिहासिक आणि अतिशय वरदळ असलेल्या ठिकाणी सर्व सोयीयुक्त आद्ययावत रुग्णालय असणे हे अतिशय आवश्यक होते, परंतु मागील कित्येक वर्षा पासून आरोग्य सेवेपासून वंचित असणारं हे तीर्थस्थळ आरोग्यसेवे विना ताटकळत होतं.
अखेर अखंड शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्याचं, गोर गरीब जनतेचं श्रद्धास्थान असणाऱ्या मातृतीर्थास अत्याधुनिक सोयी सुविधेने पारंगत असणारे 100 बेड हॉस्पिटलला राज्य सरकार मध्ये कॅबिनेट मंत्री असणाऱ्या ना.तानाजी सावंत आणि मुख्यमंत्री ना.एकनाथरावजी शिंदे यांनी विशेष बाब म्हणुन मंजुरी दिली. तेव्हा गोरगरीब लोकांच्या हाल अपेष्टाना वरील दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून न्याय मिळाला आणि कष्टकरी जनतेच्या आरोग्याची होणारी हेळसांड आता थांबणार असल्याचे समाधान महेश डोंगरे पाटील यांनी व्यक्त केले.

मागील तीस वर्षा मराठा समाजामध्ये काम करणारे व जिजाऊ जयंतीच्या माध्यमातून दर वर्षी चहा,नास्ता व अन्नदान वाटप करीत महिलांना विशेष सुविधा उपलब्ध करून देणारे महेश डोंगरे पाटील यांनी अतिशय सूक्ष्म असं निरीक्षण करीत,या ठिकाणी आद्ययावत रुग्णालयाची आवश्यकता असल्याचे वेळोवेळी मुख्यमंत्री महोदयांच्या व आरोग्य मंत्री नामदार तानाजी सावंत साहेब यांच्या निदर्शनास आणुन दिले.

आरोग्य मंत्री यांचे महेश डोंगरे यांनी आणले आभार – 

समृद्धी महामार्गवरील दिवसेंदिवस होणारे अपघात व आजूबाजूला वसलेल्या अनेक गावाना आता जालना किंवा बुलढाणा जाण्याची गरज पडणार नाही कारण, अत्याधुनिक सेवा सुविधेसह 100 बेड हॉस्पिटलला आता तत्वतः मान्यता मिळाली असुन येत्या काही दिवसात या कामाचे भूमिपूजन करून कामाला सुरुवात करण्यात येणार आहे
विशेष महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री मा ना श्री तानाजीराव सावंत साहेब यांचं जाहीर आभार। मानले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close