सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त वसंतराव नाईक रुग्णालयात उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन
यवतमाळ :/ प्रतिनिधी
स्त्री शिक्षणाच्या क्रांतीला सुरुवात करणाऱ्या,महिलांच्या स्वाभिमानाचा आवाज उभा करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय,परिसर यवतमाळ येथे रुग्णसेवकांच्या वतीने उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमात रुग्णसेवकांनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून,महिलांच्या हस्ते प्रतिमा पूजन करत अभिवादन करण्यात आले.
रुग्णांना खाऊ व पुस्तके वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचा प्रयत्न रुग्णसेवकांनी केला.उपस्थितांनी घोषणाबाजी करत सावित्रीबाईंच्या योगदानाची महती पटवून दिली.
या प्रसंगी प्रा.पंढरी पाठे यांनी आपल्या भाषणातून महिलांच्या शिक्षणाविषयी सावित्रीबाईंच्या कार्याची आठवण करून दिली आणि उपस्थित महिलांना “महिला शिक्षण दिना”च्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास संघपाल बारसे,सचिन मनवर,प्रवीण आडे,मोबीन शेख,किशोर चव्हाण,प्रफुल देशमुख,किशोर बाभुळकर,मनीषा तीरणकर यांच्यासह अनेक रुग्णसेवक,रुग्ण,मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी,महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सावित्रीबाईंच्या कार्याची आठवण करून देणारा हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला.