अमृत योजनेच्या पाईप लाईन मुळे उज्वल नगर मध्ये खड्यांचे साम्राज्य
यवतमाल / प्रतिनिधि
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अमृत योजनेच्या पाईप लाईन टाकण्याचे काम सर्वत्र सुरु असून उज्वल नगर मध्ये सुद्धा अमृत पाणी पुरवठा योजने अंतर्गत एक महीन्यापूर्वी पाईपलाईन टाकण्यात आली,उज्वल नगर मध्ये अमृत योजनेची पाईप लाईन टाकताना केलेल्या खड्याचा मुरूम टाकून व्यवस्थित भरणा केला नसल्यामुळे उज्वल नगर मध्ये खड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे,अर्धा रस्ता डांबरीकरण व अर्धा रस्ता खड्यानी व्यापलेला आहे.या खड्यातून मार्ग काढतांना नागरिकांना कसरत करावी लागते आहे,नगर परिषदेने किंवा जीवन प्राधिकरणाने याकडे त्वरित लक्ष घालून रस्ता दुरुस्त करून देण्याची मागणी नागरिकांकडून केल्या जात आहे, पावसाळ्यापूर्वी रस्ता दुरुस्त न केल्यास मोठे आंदोलन करण्यात येईल असे सामाजिक कार्यकर्ते पवन थोटे यांनी व उज्वलनगर वासियांनी एका निवेदनातून सांगितले आहे.