घाटंजीत बंजारा समाज बांधवांच्या वतीने सरकारच्या विरोधात तहसीलदारांना निवेदन
राजपूत भामटा समाजातील भामटा हा शब्द वगळून टाकण्यासंबधी राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केलेल्या घोषणा प्रकरनी राज्यात बंजारा समजाकडून तीव्र पडसाद
घाटंजी तालुका प्रतिनिधी- सचिन कर्णेवार
राज्यातील राजपूत भामटा समाजातील भामटा हा शब्द काढून टाकण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजपूत समाजाच्या महासंमेलनात केली आहे.त्याचा निषेध म्हणून आज घाटंजी येथील बंजारा समाजाचे शेकडो समाज बांधव एकत्र येऊन तहसीलदारा मार्फत निवेदन देऊन निषेध व्यक्त केला आहे. शासनाने असे केल्यास खुल्या प्रवर्गातील लाखोंच्या संख्येत असलेला राजपूत समाज हा विमुक्त जातीच्या ‘अ’ प्रवर्गामध्ये येईल. यामुळे विमुक्त जाती ‘अ’ प्रवर्गात असलेल्या १४ जातींवर फार मोठा अन्याय होणार आहे, हा निर्णय अन्यायकारक असल्यामुळे बंजारा समाज पेटून उठला असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ खासगीकरणाच्या माध्यमातून देशातील आरक्षण संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. कर्नाटका मध्ये सुद्धा बंजारा समाजाचे आरक्षण भाजपच्या तत्कालीन सरकारने कमी करण्याचा प्रयत्न केला.आता महाराष्ट्रात सुद्धा बंजारा समाजावर अन्याय केला जात आहे.राजकीय स्वार्थासाठी बंजारा समाजाचे आरक्षण संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. शासनाने विमुक्त जाती जमातीत 14 जातींचा समावेश केला आहे. त्यापैकी अनेक जाती भिक्षेकरू आहेत, या जातीचे यादीमध्ये राजपूत समाजाच्या मागे लागलेला ‘भामटा ‘हा शब्द वगळून त्यांना आरक्षण देण्याचा कुटील डाव राज्य सरकारने आरंभला आहे, राजपूत समाजाचा उल्लेखित ‘भामटा’ हा शब्द वगळून त्यांना आरक्षण देण्यात येईल ,वसंतराव नाईक भटके विमुक्त विकास महामंडळाच्या कक्षेत त्यांना आणण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केले .त्यांच्या या वक्तव्याचा निषेध समाजाच्या सर्व स्तरातून करण्यात येत आहे.३० वर्षांपूर्वी राज्यामध्ये बंजारा आणि वंजारी वाद पेटला होता.भटके विमुक्तांचे आरक्षण राजपूत समाजाच्या घशात घालण्याचा डाव हाणून लावू असा इशारा समाज बांधवानी निवेदणाद्वारे मुख्यामंत्र्यांना दिला आहे. यावेळी अरविंद जाधव जिल्हा अध्यक्ष बंजारा टायगर यवतमाळ,गणेश राठोड तालुका अध्यक्ष गोर सेना,रवी आडे अध्यक्ष भारतीय बंजारा कर्मचारी संघ,रामसिंग राठोड,मनोज राठोड सामाजिक कार्यकर्ता,बंडू जाधव सचिव राष्ट्रीय बंजारा टायगर,सुनील जाधव जिल्हा पदाधिकारी बी बी एस के,विजय राठोड,रघुनाथ राठोड,बापूराव राठोड, सुरेश पवार,रमेश आडे सुभाष राठोड, दिलीप राठोड,अरविंद जाधव तालुका सरचिटणीस युवक काँग्रेस,यशवंत राठोड,सुभाष चव्हाण,संजय जाधव,बादल राठोड,सुभाष राठोड आदी सह शेकडो बंजारा समाज बांधव उपस्थित होते.