विदेश

एन्फ्लुएन्सरचा घरात घुसून खून वाचा कुठे घडली घटना

Spread the love

इस्लामाबाद / नवप्रहार ब्युरो

                  इस्लामाबाद (पाकिस्तान ) येथे एका 17 वर्षीय एन्फ्लुएन्सर ची हत्या झाल्याने खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे ही हत्या घरात घुसून करण्यात आली आहे. यामुळे पाकिस्तान मध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे किंवा नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. तरुणीचे नाव सना युसूफ असे आहे.

सना युसूफ ही अवघ्या 17 वर्षांची होती. तिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स होते. एका अज्ञात व्यक्तीने तिच्या घरात घुसून तिच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. याच गोळीबारात तिचा मृत्यू झालाय. हा प्रकार घडल्यानंतर सनाची आई फरजाना युसूफने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी पाकिस्तान दंड संहितेच्य कलम 302 अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

सना युसुफचं टिकटॉकवर साधारण आठ लाख तर इन्स्टाग्रामवर साधारण 5 लाख फॉलोअर्स होते. दाखल एफआयआरनुसार हल्लेखोर तरुण संध्याकाळी साधारण 5 वाजता तरुणीच्या घरात घुसला. त्याने हत्येचा उद्देश ठेवून सना युसूफवर थेट गोळीबार केला. यात दोन गोळ्या तिच्या पोटत घुसल्या. सना या हल्ल्यात गंभीर जखमी झाली. तिला रुग्णालयात तातकडीने दाखल करण्यात आलं. पण रस्त्यातच तिचा मृत्यू झाला.

जिओ न्यूजच्या रिपोर्टनुसार सना युसूफ आणि गोळ्या झाडणारा हल्लेखोर हे एकमेकांना ओळखत होते. हल्लेखो आणि सना यांच्यात संवाद झाला होता, असं सनाच्या काकूने सांगितलं आहे. ‘तू इथून निघून जा. इथे चरही बजूने कॅमेरे आहेत. मी तुला पाणी आणून देते, असं सना हल्लेखोराला म्हणाली होती, असा दावा सनाच्या काकूने केला आहे. दरम्यान, सनाच्या काकूने दिलेल्या या माहितीनंतर सनाच्या खुनासंदर्भात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close