संभाजी ब्रिगेड साजरा करणार कार्यकर्ता सन्मान दिवस
अंजनगाव सुर्जी, मनोहर मुरकुटे
जगात जेवढे पक्ष/संघटना असतील त्यांच्यासाठी कार्यकर्ता हा सर्वोच्च घटक असतो.कार्यकर्त्यांच्या बळावरच कोणतीही संघटना/पक्ष मोठा होत असतो आणि कार्यकर्त्यांची मेहनत,निष्ठा,त्याग,समर्पण यावर नेतृत्व मोठे होत असते.त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा सन्मान होणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.तोच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॕड.मनोज आखरे यांचा जन्मदिवस *कार्यकर्ता सन्मान दिवस* म्हणून महाराष्ट्रात साजरा होत असतो.३ सप्टेंबर हा अॕड.मनोज आखरे यांचा जन्मदिवस आहे.आपला जन्मदिवस स्वतःच्या नावाने साजरा न करता आपल्या कार्यकर्त्यांच्या प्रती स्नेहाची आणि कृतज्ञतेची भावना म्हणून त्यांच्या नावाने साजरा झाला पाहिजे या उदात्त हेतूने *कार्यकर्ता सन्मान दिवस* संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यात येतो.त्या माध्यमातून कार्यकर्ता हा आपल्या संघटनेचा कणा आहे व त्याची आपण दखल घेतलीच पाहिजे अशी प्रदेशाध्यक्षांची प्रामाणिक भावना आहे.
संभाजी ब्रिगेडच्या स्थापनेपासून अॕड.मनोज आखरे एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करीत आहे.संभाजी ब्रिगेडच्या ३० वर्षाच्या वाटचालीत अनेक चढ उतार त्यांनी पाहिलेले आहे.आपले संपूर्ण तारुण्य त्यांनी संभाजी ब्रिगेडसाठी अर्पण केले आहे.गाव पातळीवरुन सुरू झालेला त्यांचा प्रवास आज प्रदेशाध्यक्ष या सर्वोच्च पदापर्यंत येऊन पोहोचलेला आहे.संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रात एक वैचारिक,आक्रमक आणि लढाऊ संघटन म्हणून प्रसिद्ध आहे.या संघटनेने महाराष्ट्राच्या सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात फार महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे आणि आता १०० टक्के समाजकारण व १०० टक्के राजकारण ही भूमिका घेऊन मनोज आखरे यांनी आपल्या संघटनेला राजकारणामध्ये मजबूत करण्याचा निर्धार केलेला आहे.त्यासाठी त्यांनी शिवसेनेसारख्या बलाढ्य पक्षासोबत संभाजी ब्रिगेडची युती करून संभाजी ब्रिगेडला सत्तेपर्यंत पोहोचविण्याचा विडा उचललेला आहे.या सर्व गोष्टी कार्यकर्त्यांच्या शिवाय शक्य नाही. कार्यकर्त्यांचा सन्मान झाला तर कार्यकर्ता आणखी जोमाने संघटनेसाठी काम करतो.ही जाणीव ठेवून अॕड.मनोज आखरे यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात *कार्यकर्ता सन्मान दिवस* म्हणून विविध सामाजिक,सांस्कृतिक,धार्मिक शैक्षणिक,कृषी विषयक उपक्रमांच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात कार्यकर्ता सन्मान दिवस साजरा होणार असून महाराष्ट्रातील प्रामाणिक कार्यकर्त्यांचा याप्रसंगी जाहीर सत्कार होणार आहे.अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते प्रा.प्रेमकुमार बोके यांनी दिली आहे.