अपघात

अतिक्रमित अँगलला धडकल्याने दुचाकीस अपघात;दुचाकीस्वार जागीच ठार तर एकजण जखमी

Spread the love

पुसद / प्रतिनिधी

विधानसभा क्षेत्रात येत असलेल्या ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काळी दौ. येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोरून मृतक करण एम.एच.२९ सीए ७३९२ या दुहेरी आसन दुचाकीने जात असतांना तेथील रस्त्यात अतिक्रमित असलेल्या लोखंडी अँगलला धडकल्याने दुचाकीस अपघात झाला त्यात दुचाकीस्वार जागीच ठार तर एकजण जखमी झाल्याची घटना दि.२५ ऑगस्ट रोजी घडल्याचे पोलीस सूत्रांकडून कळते. करण प्रभाकर राऊत वय २८ वर्ष रा.हिवरी ता.महागाव असे मृतकाचे नाव आहे. तर मृतक करणच्या दुचाकीवर मागील बाजूस स्वार असलेला शंकर मुधोळ रा. हिवरी वय २९ वर्षे हा गंभीर जखमी झाला असून त्यास यवतमाळ येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
काळी दौ.येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोरील बाजूस तेथील नागरिकांनी मोठ्याप्रमाणात अतिक्रमण केलेले आहे. तेथील अतिक्रमनामुळे रस्ता अरुंद झाला असून अपघाताची मालिका सातत्याने सुरू असते. पुढील तपास जमादार ससाणे हे करीत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close