क्राइम
राज्य उत्पादन शुल्क विभागातील कर्मचारी लाच घेतांना ACB च्या जाळ्यात

दारू वाहतुकीत जप्त दुचाकी सुपुर्दनाम्यावर सोडविण्यासाठी मागितली होती लाच
मोर्शी (तालुका प्रतिनिधी)
अवैध दारू वाहतुकीत जप्त दुचाकी सुपुर्दनाम्यावर सोडविण्यासाठी 10 हजाराची लाच मागणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या हवालदाराला ACB ने अटक करण्यात आली आहे.
अमरावती येथील लाच लुचपत विभागाच्या कार्यालयाच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार दिनांक 8 एप्रिल रोजी यातील तक्रारदार यांचेकडून त्यांची अवैध दारु वाहतुकीचे गुन्हयात जप्त असलेली मोटर सायकल सुर्पूदनाम्यावर परत देणेकरीता राज्य उत्पादन शुल्क विभाग, मोर्शी, जि. अमरावती कार्यालय येथील पोलीस कर्मचारी तिडके यांनी १० हजार रुपये लाचेची मागणी करीत असल्याबाबत तकार लाच लुचपत विभागाला प्राप्त झाली होती.
सदर तक्रारीवरुन दि.८एप्रिल रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान तकारदार यांना त्यांचे अवैध दारु वाहतुकीचे गुन्हयात जप्त असलेली मोटर सायकल सुर्पूदनाम्यावर परत देणेकरीता राज्य उत्पादन शुल्क विभाग मोर्शी कार्यालयातील पोलीस कर्मचारी दिनकर तिडके यांची तडजोडीअंती ५ हजार रुपये लाचेची मागणी करुन लाच रक्कम स्विकारण्याचे मान्य केले असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आयोजित सापळा कारवाई दरम्यान दिनकर तिडके हे राज्य उत्पादन शुल्क विभाग मोर्शी कार्यालयात हजर मिळून न आल्याने सापळा कारवाई होवू शकली नाही.
त्यानंतर सोमवार दि २२ एप्रिल रोजी करण्यात आलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान दिनकर तिडके, पद जवान, राज्य उत्पादन शुल्क विभाग, मोर्शी, जि. अमरावती यांनी तक्रारदार यांचेकडून तडजोडीअंती मागणी केलेली ५ हजार रुपये लाच रक्कम स्विकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. नमुद आरोपींविरुध्द पो.स्टे. मोर्शी, अमरावती ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
सदरची कार्यवाही अॅन्टी करप्शन ब्युरो, अमरावती परिक्षेत्र पोलीस अधीक्षक मारुती जगताप , अपर पोलीस अधीक्षक अनिल पवार अॅन्टी करप्शन ब्युरो, अमरावती परिक्षेत्र, अमरावती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक मिलिंद बहाकर श्री. मंगेश मोहोड, पोलीस उपअधीक्षक, पो.हवा. प्रमोद रायपुरे, पो.ना.नितेश राठोड, पो.ना. युवराज राठोड व चालक पो.हवा. चंद्रकांत जनबंधु यांनी पार पाडली.
नागरीकांनी अशाच प्रकारे भ्रष्टाचारा संबंधी तक्रार देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन लाच लुचपत विभागाच्या वतीने करण्यात आले
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1