एलिफंटा बोट अपघात प्रकरण प्रत्यक्षदर्शी ने सांगितले नेमके काय झाले
मुंबई / नवप्रहार डेस्क
गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटा कडे निघालेल्या एका प्रवाशी बोटीला नेव्ही च्या स्पीड बोटीने धडक दिल्याने प्रवाशी बोट बुडल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. अपघात इतका भयंकर होता की धडक बसल्यानंतर प्रवाशी बोटीचे दोन तुकडे झाले. त्यामुळे प्रवाशी बोटीतील प्रवाशी पाण्यात पडले. यात 13 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 8 ते 10 प्रवाशी बेपत्ता आहेत. 101 प्रवाश्यांना वाचविण्यात प्रशासनाला यश आले आहे. या अपघातातून बचावलेल्या एका तरुणीने बोटीवर काय घडलं, याचा अंगावर शहारे आणणारा अनुभव सांगितला.
बचावलेली तरुणी ही कुर्ला परिसरात राहणारी आहे. ती आपल्या कुटुंबीयांसह एलिफंटा लेणी पाहण्यासाठी नीलकमल बोटीतून जात होती. “आम्ही बोटीत जवळपास 40 ते 45 मिनिटं होतो. पण अचानक बोटीला आम्हाला मोठा धक्का जाणवला. आम्ही खाली पडलो. बाहेर येऊन पाहिलं तर समोरील बोटीतला एक जण आमच्या बोटीत येऊन पडला होता. तर दुसरा माणूस हा त्याच बोटीवर लटकलेला होता. अपघात झाल्यानंतरही आमची बोट सुरू झाली. पण 5 मिनिटानंतर लगेच बोटीतील कर्मचारी आली आणि त्यांनी जॅकेट घालायला सांगितले. काही जणांपर्यंत त्या लोकांनी जॅकेट आणून दिले होते. पण काही वेळानंतर बोट एका बाजूला बुडायला लागली. हळूहळू बोट पाण्यात बुडाली. काही माणसं हे पाण्याखाली गेले होते. काही गरोदर महिला होत्या, तर काही मुलं होती ती पाण्यात बुडाली होती” असं या तरुणीनं सांगितलं.
“आम्हाला काहीच कळत नव्हतं. मी मुलाला पकडून ठेवलं. आम्ही जॅकेटमुळे वाचलो. बोटीला धरून आम्ही वरती आलो. त्यानंतर तिथे दुसऱ्या बोटी आल्या. बोटी यायला जवळपास अर्धातास वेळ लागला होता. आल्यावर त्यांनी खूप मेहनत केली. काही जणांच्या तोंडात रॉकेल गेलं. त्यामुळे काही जणांचा मृत्यू झाला. बोटीवर असलेल्या एका परदेशी पर्यटक दाम्पत्याने जीवाची बाजी लावून लोकांना वाचवलं, असंही तिने सांगितलं.
मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयाची मदत
बोटीला धडक दिल्यामुळे बोटीत पाणी घुसले आणि बोट बुडू लागली त्यावेळी काही प्रवासी बोटीवर आपला प्राण वाचवण्यासाठी मदतीची हाक देत होते. घटना घडल्यानंतर तटरक्षक दल आणि सागरी पोलिसांच्या समन्वयाने नौदलाने बचावाचे प्रयत्न सुरू केले. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयाची मदत करण्यात आली आहे.
सखोल चौकशी करण्यात येणार
101 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. 13 जणांना मृत घोषित केलं. 3 नौदलातील आणि 10 प्रवासी आहेत. त्यातील दोन जण गंभीर आहे. अजूनही शोध कार्य सुरू आहे या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
बोट अपघातातील मृतांची नावं
1) महेंद्रसिंग शेखावत ( नेव्ही)
2) प्रवीण शर्मा (NAD बोट वरील कामगार)
3) मंगेश(NAD बोट वरील कामगार)
4) मोहम्मद रेहान कुरेशी (प्रवासी बोट)
5) राकेश नानाजी अहिरे( प्रवासी बोट)
6) साफियाना पठाण मयत महिला
7) माही पावरा मयत मुलगी वय-३ तीन
8) अक्षता राकेश अहिरे
9) अनोळखी मयत महिला
10) अनोळखी मयत महिला
11) मिथु राकेश अहिरे वय- ८ वर्षे
12) दिपक व्ही.
13) अनोळखी पुरुष