श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालयात विद्यार्थ्यांकरीता निवडणूक मतदान यंत्राचे (EVM )प्रशिक्षण

अंजनगाव सूर्जी
स्थानिक श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालय अंजनगाव सुर्जी, येथे तहसील कार्यालय,अंजनगाव सुर्जी तर्फे दि. 28-12-2023 रोजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरिता इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन यंत्राचे प्रशिक्षण देण्यात आले. तहसील कार्यालय अंजनगाव येथील श्री दीपक वांडे (तलाठी) तसेच श्री आशिफ शाह (कोतवाल) यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. याप्रसंगी राज्यशास्त्र विभाग प्रमुख श्री सुरेंद्र किन्हीकर यांनी विद्यार्थ्यांना मतदान कसे करावे तसेच
EVM ,VVPAT याविषयी माहिती विषद केली. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतः निवडणूक मतदान यंत्रामध्ये मतदान करून पाहिले. या प्रशिक्षण कार्यक्रमाकरीता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ चौबे यांचे मार्गदर्शन लाभले.या प्रशिक्षण कार्यक्रमात महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ घोडीले, डॉ बिना राठी, डॉ डगवाल, डॉ मालधुरे,डॉ कविता मालोकार, डॉ अंशुमति कहाने,प्रा प्रतिभा थोरात, डॉ झिलपे,डॉ छाबा, कुआशा बनाईत, कु चौधरी डॉ महेंद्र गिरी,डॉ समीर बिजवे, डॉ ममता येवतकर, डॉ पवन राऊत, डॉ विवेक पाटील, श्री कुलकर्णी, डॉ अनिकेत भुयार श्री आनंद थोरात तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.