सामाजिक

महापरिनिर्वाण दिनानिमित्त बौद्ध विहार लाखनी येथे मोफत आरोग्य शिबिर……

Spread the love

कहालकर दुःखनिवारक दवाखाना भंडारा, सत्य साई संस्थान व इलमकार दवाखाना यांचे संयुक्त विद्यमाने केले होते आयोजन

लाखनी : बोधीसत्व, विश्वरत्न महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दि. 06 डिसेंबर 2023 ला महाप्रज्ञा बुद्ध विहार मुरमाडी लाखनी येथे मोफत वैद्यकीय आरोग्य सेवा शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

आरोग्य शिबिरात 85 रूग्णांनी सेवेचा लाभ घेतला असून शरीराचे दुखणे, मणक्याचे समस्या, हाडांचे दुखणे, नेत्ररोग, स्त्रियांचे समस्या संपूर्ण आरोग्य तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात आला. आरोग्य शिबिरात सहभागी कहालकर दुःखनिवारक दवाखाना चे डॉ.अक्षय कहालकर, सत्य साई संस्थान चे श्री. रविंद्रजी नागपूरे, इलमकर दवाखाना चे डॉ. कविता इलमकार व डॉ. सुषमा इलमकर यांनी सेवा दिली. बाबासाहेब आंबेडकरांना सकाळी 9:00 वाजता धम्मवंदना व अभिवादन करण्यात आले, त्यानंतर आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विहाराचे अध्यक्ष आयु. सुरेंद्रजी बंसोड, सचिव प्रा. रेवाराम खोब्रागडे, उपाध्यक्ष देशपांडे, वैद्य, जांभूळकर यांनी परिश्रम घेतले. तसेच 85 धम्मसेवकांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close