क्राइम

पुसला येथील बार मालकावर चाकुहल्ला करणारे गुन्हेगार गजाआड

Spread the love

तब्बल एका महिन्यातच अज्ञात आरोपीतांचा शोध लावण्यात पोलिसांना यश.

वरूड/तूषार अकर्ते

दि.१२ जुन रोजी शे.घाट पोलिस स्टेशन हद्दीतील पूसला येथील माही बार मालकावर रात्री १० वाजता च्या दरम्यान बार बंद करून वरूड ला आपल्या दुचाकीने घरी जात असताना काही अज्ञात आरोपीतांनी चाकुहल्ला केला होता.या बाबत शे.घाट पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. या तकारीवरून शे.घाट पोलिस स्टेशन येथे आरोपीविरूद विविध गुन्हे दाखल असून सदर गुन्हा उघडकीस आणण्याकरीता पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी शे.घाट येथील अधिकारी व अमलदार यांना आदेशित करण्यात आले होते. शे.घाट पोलिस स्टेशन मधील चाकुहल्ल्यातील फिर्यादी सचिन किसणलाल जयस्वाल (४५) रा.सती मंदीराजवळ वरूड यांचे बयाणावरून फिर्यादी हे घटनेवेळी त्यांचे दुचाकीने पुसला येथुन त्यांचे माही बार बंद करून काउंटवरमधील पैसे घेवुन घरी परत जात असताना आरोपीतांनी त्यांचे ताब्यातील दुचाकीचा पाठलाग करून त्यांच्या जवळ येवुन त्यांच्या जवळील पैसे जबरीने हिसकण्याचा प्रयत्न करून धारदार चाकुने त्यांच्या पाठीवर वार करून त्यांना जखमी केले होते. या वरून अज्ञात आरोपीविरूद कलम ३९४ नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. सदर आरोपी हे घटणेच्या दिवसापासून फरार होते व आरोपी हे अज्ञात असल्याने गुन्हा उघडकीस आणुन जनमानसामधे पोलीसांची प्रतिमा उंचावण्याचे पोलीसांसमोर मोठे आव्हान निर्माण झालेले होते.अशा
परीस्थितीत वरीष्ठांनी दिलेल्या सुचनेनुसार पोलीस पथके तयार करू सदर गुन्ह्याचा तपास सुरू असतांना पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहीती नुसार सदर गुन्ह्यातील आरोपी अजय भारत वाडेकर (२४) व मनोज पुरुषोत्तम
मांगरूळकर (२९) दोघेही रा.कवठा (बाहाळे) ता.भातकुली जि.अमरावती यांना गुन्ह्यात निष्पन्न करून दोन्ही आरोपीतांना पोलीसांनी नागपुर येथुन मोठया शिताफिने ताब्यात घेवुन सदर गुन्ह्यात अटक केले असुन सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे.
सदर आरोपीतांनी अमरावती शहरात दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याचे सांगीतले आहे. तसेच इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर पोलिस अधीक्षक शशिकांत सातव, उपविभागीय पोलीस अधीकारी डॉ.निलेश पांडे व शें.घाटचे ठानेदार सतिश इंगळे यांचे मार्गदर्शनात विष्णु पवार, संदीप वानखडे, विरेंद्र अमृतकर, सागर लेव्हलकर यांनी केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close