राजकिय

कारला येथे गिरासे पॅनल चा दणदणीत विजय ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे वर्चस्व ;

Spread the love

चांदुर रेल्वे  / प्रतिनिधी

तालुक्यातील कारला आणि पाथरगाव ह्या दोन ग्रामपंचायती साठी काल मतदान पार पडले तर तालुक्यातीलच कळमगावच्या एक सदस्या साठी मतदान झाले आज झालेल्या मतमोजणी नुसार तालुक्यातील कारला ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा प्रणित शुभम गिरासे गटाचे प्रमोद कुंभरे हे संरपचपदी विजयी झाले तर
पाथरगांव ग्रामपंचायतच्या निवडणुकीत भाजपा प्रणित पॅनलच्या अनिता अनिल राठोड ह्या संरपचपदी मतांनी विजयी झाले कळमगावच्या ग्रा. पं. सदस्यपदी भाजपा प्रणित मालिनी वाघ ह्या विजयी झालेत.
चांदूर रेल्वे तालुक्यातील कारला व पाथरगाव ग्रा. पं. मध्ये थेट सरपंच व सदस्यांकरीता निवडणुक तसेच कळमगाव ग्रा.पं.मध्ये रिक्त एका सदस्यासाठी पोटनिवडणुकीचे मतदान रविवारी झाले. यामध्ये जवळपास एकुण ८० टक्के मतदान झाले होते, त्यात आज सकाळी १० वाजतापासून मतमोजणी सुरू झाली होती . कारला ग्रा.पं.मध्ये थेट सरपंचपद अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव होती त्यात भाजप प्रणित शुभम गिरासे पॅनल चे प्रमोद कुंभरे हे विजयी झाले त्यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. सर्व विजयी सदस्य व सरपंचाचे प्रसिद्ध उद्योजक संदीप गिरासे, शुभम गिरासे यांनी स्वागत केले यावेळी उमेदवारांच्या विजयासाठी शैलेंद्र जाधव, अतुल जाधव, पप्पू जाधव, यशपाल मोहड, बाबाराव शिंडे किसन सपाटे, राजू बोरकर, पद्माकर गिरासे, बळीराम राठोड शंकर जाधव यांनी परिश्रम घेतले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close