क्राइम

एकाच्या आईसोबत अनैतिक संबंधाच्या संशयावरून चार मित्रांनी तरुणाला संपवले

Spread the love

कोयत्याने वार करून हत्या 

आरोपी चार अल्पवयीन मुले 

प्रतिनिधी / पुणे 

             अनैतिक संबंधाच्या संशयावरून चार अल्पवयीन मुलांकडून कोयत्याने वार करण्यात आलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.  राहुल जाधव असं या हल्ल्यात मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे.

हल्ला केल्यानंतर हल्लेखोर फरार झाले, त्यानंतर राहुलला पुण्यातील खासगी रुग्णालयात नेण्यात आलं, पण उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला आहे.

राहुल जाधववर हल्ला करणारे चारही आरोपी अल्पवयीन आहेत. या चारही अल्पवयीन आरोपींना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत तरुणाचे आरोपींच्या पैकी एकाच्या आईसोबत प्रेम संबंध होते. या प्रेम संबंधांवरुन सर्व आरोपींनी राहुलला जीवे मारण्याचा निर्णय घेतला.

कोथरूड परिसरामध्ये संध्याकाळी सव्वापाचच्या सुमारास राहुल सागर कॉलनीमध्ये दुचाकीवरून जात होता, तेव्हाच आरोपींनी त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की राहुलला यात जीव गमवावा लागला आहे. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या चारही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close