क्राइम

आठवीच्या विद्यार्थ्यांकडून 10 वी च्या विद्यार्थ्याची हत्या 

Spread the love

अहिल्यानगर  / नवप्रहार ब्युरो

                  मुलाला चांगले वळण लागावे म्हणून पालक आपल्या आपल्या पाल्यांना शाळेत पाठवतात. पण सध्याची मुल शिक्षणाच्या काळात वाममार्गा कडे वळत असल्याचे पाहायला मिळत आहे. आठवीत शिकणाऱ्या एका मुलाने दहावीत शिकणाऱ्या मुलावर चाकू हल्ला केल्याने 10 वी च्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. शाळेच्या आवारातच ही घटना घडली आहे. सीताराम सारडा महाविद्यालयामध्ये हा प्रकार घडला आहे.

 आठवीच्या विद्यार्थ्याने शाळेच्या आवारातच हल्ला केला.त्यात हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारारार्थी घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाला. मोहम्मद मुस्तकीन शेख असं मृत मुलाचं नाव आहे. या घटनेनं शाळेसह आजूबाजूच्या परिसरात विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close