तरुणाने ठाण्यात येऊन असे काय सांगितले की पोलिसांनी हॉटेल कडे घेतली धाव
प्रयागराज / नवप्रहार डेस्क
प्रयागराज पोलीस ठाण्यातील काही लोक आपल्या कामात व्यस्त होते. तर काही गप्पा मारत बसले होते . तर काही टिव्ही वर चाललेल्या बातम्या पाहण्यात व्यस्त होते. ईतक्यात एक तरुण ठाण्यात दाखल झाला. तो सरळ ठानेदाराच्या कॅबिेन मध्ये घुसला. त्याने ठानेदाराला काय सांगितले कोणास ठाऊक पण ठानेदारांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या स्टाफ ला आदेश देत हॉटेल वर पाठवले.
विवेक कुमार असे त्या तरुणाचे नाव आहे. तो सुमन देवी वय वर्ष ३५ रा.गोपाल भदरी हिला घेऊन शिवगड येथील ओयो हॉटेल मध्ये आला होता. विवेक आणि सुमन यांनी नवरा-बायको असल्याचे सांगून खोली बुक केली होती. त्या दोघांमध्ये लग्नाबाबत वाद सुरू होता. सुमन आपल्याकडे पाच लाख रुपये मागत होती, न दिल्यास पोलिसांकडे तक्रार करेन, अशी धमकीही देत होती.१० वर्षांपूर्वी तिचे लग्न झालं. तिचा नवरा बलकरनपूर गावचा रहिवासी होता. नवऱ्याशी पटत नसल्यामुळे ती माहेरी राहात होती. रविवारी दुपारी ती विवेक कुमारबरोबर शिवगड असलेल्या येथील हॉटेलवर आली होती.विवेक हा सुमनपेक्षा १० वर्षांनी लहान असून, अनेक वर्षांपासून त्यांच्यात संबंध होते.
आपण गर्लफ्रेंडची हत्या करून आल्याचं” विवेकने पोलिसांना सांगितलं. तिचा मृतदेह ओयो हॉटेलमध्ये असल्याची माहितीही त्याने पोलिसांना दिली. हे ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. त्यांनी तातडीने त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्यासह ओयो हॉटेलला भेट दिली. तेव्हा त्याच्या प्रेयसीचा मृतदेह बेडवर होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. फिल्ड युनिट आणि फॉरेन्सिक एक्सपर्ट्सना पाचारण करण्यात आलं. त्यांनी आवश्यक साक्षी पुरावे गोळा केले. आरोपी विवेक कुमार हा सध्या पोलिसांच्या ताब्यात असून पोलिस त्याची कसून चौकशी करत आहेत. ही हत्या प्रेमप्रकरणाशी संबंधित वादातून झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर येत आहे.
सोरावचे एसीपी जंग बहादूर यादव म्हणाले, “ओयो हॉटेल मॅनेजर आणि कर्मचारी यांची चौकशी करत आहोत. महिला आणि आरोपी हॉटेलमध्ये कधी आले, त्यांनी कोणती ओळखपत्र देऊन खोली बुक केली होती याबाबत अधिक माहिती घेत आहोत,” असेही यादव यांनी सांगितलं. मृत महिलेच्या कुटुंबालाही या घटनेबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यांच्याकडून तक्रार दाखल करून घेतल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे यादव यांनी सांगितलं.