आयशर ट्रक व ऑटो चा अपघात तीन जखमी सोमठाणा घाटातील घटना.
डॉ. गुणवंत राठोड कारंजा प्रतिनिधी
दि 27/4/24 दुपारी 3:50 सुमारास सविस्तर वृत्त असे की MH 20EL 35 10 संभाजीनगर वरून यवतमाळ कडे जात असताना आयशर ट्रकने कारंजा दारव्हा रोडवर सोमठाणा घाटामध्ये ऑटोला जबरदस्त धडक दिली व यामध्ये ऑटो मधील प्रवासी सुनील उत्तमराव नालाट वय 55रा मनभा गंभीर जखमी झाले. धडक दिल्यानंतर हा ट्रक समोर घाटात पलटी झाला यामध्ये चालक अमोल इंदोरे वय 35रा संभाजीनगरव क्लीनर सुनील शिंदे वय 25 रा खामगाव हे किरकोळ जखमी झाले अपघाताची माहिती माजी नगरसेवक मुजहीद भाई यांनी तात्काळ समृद्धी रुग्णवाहिकेचे अजय घोडेस्वार यांना दिली त्यांनी संत गाडगेबाबा विचार मंडळाचे अध्यक्ष संतोष धोंगडे यांना दिले त्यांनी श्री संत गाडगेबाबा रुग्णवाहिका सेवा रुग्णसेवक सुमित बागडे यांना दिली तात्काळ घटनास्थळी पोहचले जगद्गुरु नरेंद्राचार्य रुग्णवाहिका सेवे चे नितीन पाटील व श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रमेश देशमुख तात्काळ पोहचले व सर्व जखमी रुग्णाला कारंजा उपजिल्हा रुग्णालयाचेयेथे आणले. येथील वैद्यकीय आणि प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी अमरावती ते पाठवले. घटनास्थळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार खंडारे साहेब प्रामुख्याने हजर होते. सोबत त्यांच्यासोबत त्यांचे कर्मचारी देखील हजर होते. पुढील तपास ग्रामीण शहर पोलीस स्टेशन कारंजा करीत आहे.