भाजपा ची आर्वी – कारंजा अर्थसंकल्पीय बैठक संपन्न
आर्वी / प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी विधानसभा आर्वी कारंजा मंडळ च्या वतीने पावसाळी अधिवेशन अर्थसंकलपीय बैठक आज दिनांक १४/०७/२०२४ ला भाकरे महाराज सभागृहात पार पडली या बैठकीला उपस्थित आर्वी विधानसभा आमदार आदरणीय दादारावजी केचे साहेब तसेच प्रमुख वक्ते भाजपा वर्धा जिल्हा महामंत्री आदरणीय श्री अवीनाशजी देव तसेच भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव सौ. सरीताताई गाखरे, यांनी अर्थसंकल्पात सर्वसाधारण शेतमजूर, शेतकरी, शैक्षणिक, व महिलांसाठी लाडली बहीण, या योजना नागरीकांनपर्यन्त पोहचवणे व त्यांना सर्व योजनांचा लाभ मिळेल .कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
बैठकीत प्रमुख उपस्थिती वर्धा जिल्हा नियोजन समीती सदस्य मूकंदराव भाऊ बारंगे, भाजपा वर्धा उपाध्यक्ष श्री शीरीष भाऊ भांगे, भाजपा वर्धा चिटणीस जगदीश भाऊ डोळे, भाजपा वर्धा जिल्हा चिटणीस राजूभाऊ डोंगरे, माजी जी. प. समाज कल्याण सभापती सौ. नीताताई गजाम, भाजपा कारंजा मंडळ तालुका अध्यक्ष चक्रधर डोंगरे भाजपा कारंजा शहर अध्यक्ष दिलीप भाऊ जसूतकर आणि बैठकीत मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ता उपस्थित होते..