ब्रेकिंग न्यूज

इरसालगड येथे दरड कोसळली अनेक लोकांचा मृत्यू

Spread the love

अनेक कुटुंब मलब्याखाली दबुन असल्याची शंका

रायगड / नवप्रहार वृत्तसेवा 

                  जीह्यातील खालापूर जवळील इरसालगड (इरसालवाडी ) येथे धो धो बरसणाऱ्या पावसामुळे दरड कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत मलब्याखाली दबून अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ च्या दोन तुकड्या आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे.

   राज्यातील काही भागात कोसळधार बरसणाऱ्या पावसाने हाहाकार माजवला आहे. रायगड जिल्ह्यात पावसाने नागरिकांना सळो की पळो करून सोडले आहे. काल (बुधवार) रात्री खालापूरजवळील इरसालगड (इरसाल वाडी) येथे दरड कोसळून अनेक कुटुंब मलब्याखाली अडकून मृत्यूमुखी पडल्याची दुर्देवी घटना घडली आहे.

या गावात 50 ते 60 घरांची वस्ती असून जवळपास 200 ते 300 मतदार असल्याचे समोर आलेय. प्राथमिक माहितीनुसार मलब्याखाली अंदाजे तीस ते 40 घरातील लोक अडकले आहेत. रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 60 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. अनेकांना वाचवण्यात यश आलेय. बचावकार्य अद्याप सुरु आहे. नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणातील घरांजवळ ही घटना घडली.

इरसालवाडीमध्ये माळीण आणि तळीयेची पुनरावृत्ती झाली आहे. रायगडमधील तळीये आणि माळीण गावावर दरड कोसळून अनेकांचा मृत्यू झाला होता. तळीये गावातील 35 घरांवर दरड कोसळली होती, यामध्ये 44 जणांचा मृत्यू झाला होता. तर माळीणमध्ये 151 जणांनी आपले प्राण गमावले होते. सकाळी माळीण गावावर डोंगर कोसळला, दरड कोसळली आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली मूळ माळीण गावातील 74 पैकी 44 घरे दबली गेली. जवळजवळ संपूर्ण गाव क्षणार्धात गायब! यामध्ये 151 जणांचा प्राण गेला होता. याच दुर्घटनेची पुनरावृत्ती पुन्हा एकदा झाली आहे. इरशाळगडमधील तीस पेक्षा जास्त घरावर दरड कोसळली आहे. मलब्याखाली आणखी 40 ते 45 मृतदेह अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र पावसामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण होत आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.

इरशाळगड गावावर दरड कोसळल्याची माहिती मिळताच मत्री उदय सामंत, गिरीश महाजन, दादा भुसे आणि महेश बालदी यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तात्काळ इरशाळगड येथील दुर्देवी घटनेचा आढावा घेतला. त्यांनी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज घटनास्थळाला जाण्याची शक्यता आहे.

बचावकार्यात अडथळा –
दुर्देवी घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफच्या दोन तुकड्या घटनास्थळी पोहचल्या आहेत. त्याशिवाय पोलिसही घटनास्थळावर पोहचले आहेत. अंधार आणि संततधार पावसामुळे बचावकार्यात अडथळा होत आहे. त्यामुळे बचावकार्य थांबवण्यात आले असून सकाळी पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. पावसामुळे अजूनही डोंगरावरची माती घसरतेय .. गावापर्यंत पोहोचण्याचा रस्ता बंद असून वाहने जात नाहीत, अर्धा तास चालत जावं लागत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close