क्राइम

नाकेबंदी दरम्यान दुचाकीसह दोन स्कूल बॅगमध्ये 48 लिटर गावठी मोहा दारू केला जप्त..

Spread the love

 

आर्वी(निखिल  वानखडे )

आर्वी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आर्वी देऊरवाडा मार्गावरील शीतला माता मंदिर समोर नाकेबंदी केली . दुचाकी वर अवैधरित्या दारूची वाहतूक करताना दोघे आढळून आले
दोन मोठ्या स्कूल बॅग मध्ये प्रत्येकी दोन लिटरच्या 24 बिसलरी बाटल्या मध्ये 48 लिटर गावठी मोह दारू तसेच एक काळ्या रंगाची बजाज डिस्कवर एम एच 32 ए एफ 12 48 असा एकूण 75 हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून दोघांना आज तारीख 13 दुपारी पाच ते साडेपाचच्या दरम्यान केली आहे.

आयुबखान गुलाब खा वय 47 वर्ष राहणार आंबेडकर वार्ड आर्वी रवींद्र विठ्ठलराव उईके वय 49 वर्ष राहणार संजय नगर आर्वी या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे

पोलीस शिपाई राहुल देशमुख यांनी यासंदर्भात फिर्याद पोलीस स्टेशन आर्वी येथे नोंदविली आहे

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आर्वी देऊर वाडा मार्गावरील शीतला माता मंदिर समोर नाकेबंदी
केली असताना दुचाकी वर दोघे वाहनाचे कागदपत्र व लायसन सोबत न बाळगता वाहतूक करीत असल्याचे मिळून आले त्यांच्याजवळ दोन स्कूल बॅगमध्ये असलेला गावठी मोहा दारू दुचाकी मुद्देमाल पंचासमोर जप्त केला गावठी दारू व बाकी वस्तूचा नाश करून सॅम्पल घेण्यात आले .

आणि आरोपी विरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला ही कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुळ हसन माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे उपविभागीय पोलीस अधिकारी देवराव खंडेराव यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार यशवंत सोळसे यांच्या निर्देशाप्रमाणे पोलिस हवालदार रामकिसन कासदेकर अमर हजारे पोलीस शिपाई अमलदार राहुल देशमुख स्वप्नील निकुरे आदींनी केली

फोटो… दुचाकीसह दारूचा मुद्देमाल जप्त आणि आरोपी

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close