अजय बारस्कर यांनी जरांगे पाटलावर केले गंभीर आरोप
कोणत्या मायमाउलीकडून तू कंबरेपर्यंत…’
“मी तुला कसले प्रश्न विचारले? मी त्याला वैयक्तिक प्रश्न विचारले का? मागे 17 दिवसांचं आंदोलन झालं तेव्हा तू रात्री कुणाच्या घरात दूध-भात खात होता? माझ्याकडे रेकॉर्ड नाही का? माझ्याकडे पुरावे नाहीत? कोणत्या मायमाउलीकडून तू कंबरेपर्यंत पाय दाबून घेतले, माझ्याकडे पुरावे नाहीत? माझ्याकडे व्हिडीओ आणि रेकॉर्डींग आहेत. कोणत्या माता-माऊलीला तू आंबडचा आमदार बनवण्याचा शब्द दिलाय? जरांगे मला माहिती आहे. पण आमची ती संस्कृती नाही. आम्ही सामाजिक प्रश्नावर आवाज उठवला. डील काय झाली ते आम्हाला माहिती आहे”, असं अजय महाराज बारसकर म्हणाले.
‘रातोरात एखाद्या माणसाकडे एवढे पैसे कसे येतात?’
“तुमच्या पाहुण्याच्या दारात कसे डंपर आले, वाळू काढायचे 45 डंपर कसे आले? तीन महिन्यात आले. तपास करा. मी इनकम टॅक्सकडे जाणार आहे. रातोरात एखाद्या माणसाकडे एवढे पैसे कसे येतात? वाळूचा धंदा चालतो. तहसीलदार, एसडीएम एवढे घाबरले आहेत, भेदरले आहेत. एकाही गाडीवर नंबर नाही. धंदे चालू आहेत. दमनची दारु आणली. ट्रकमधून उडी मारली. कुणाला गुंतवलं? माझ्यावर आरोप केले. संभाजी राजांच्या नावाखाली पैसे खाल्ले आणि तुझ्यावर कलम 420 फसवणुकीचा गु्न्हा पुण्यात दाखल आहे. जरांगे तू सुटणार नाही. मी चुकलो तर मी जाईल. तुझ्यात 420 चा गुन्हा आहे. हिंमत असेल तर माझ्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोक. मी सर्व पुरावे कोर्टात सादर करेन”, असं चॅलेंज बारसकर यांनी दिलं.
मुंबईला मोर्चा आल्यानंतर कुणाचं कुटुंब फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहिलं?’
“आम्ही तुला सामाजिक चळवळीचे प्रश्न विचारले होते तू आमच्या घरापर्यंत आला. आम्हाला माहिती नाही का, मुंबईला मोर्चा आल्यानंतर कुणाचं कुटुंब फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहिलं? माझ्याकडे व्हिडीओ नाहीत? मला कुणाच्या कुटुंबापर्यंत जायचं नाही. माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. आम्ही तुकोबारायांचे वारकरी आहेत. याचे असे 50 ते 100 रेकॉर्डिंग आहेत”, असा दावा अजय महाराज बारसकर यांनी केला.
मी नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग आणि इतर चाचण्यांना तयार’
“मी नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग आणि इतर चाचण्यांना सामोरे जायला तयार आहे. तुम्ही पारदर्शक असल्याचे म्हणतायत तर माझ्यासहित तुम्हीही या चाचण्यांना समोर या. उद्या ११ वाजता इथे बॉम्ब फुटणार आहे. उद्या ११ वाजता या मी खुलासा करेन. उद्या पत्रकार परिषद घेणारी लोक वेगळी असतील”, असा इशारा अजय महाराज बारस्कर यांनी दिला.