यामुळे कोंबड्यांना खाऊ घालत आहे व्हायग्रा आणि शिलाजीत
आंध्रप्रदेश / नवप्रहार मीडिया
कोंबड्यांना किंवा कोंबडीला त्याचे वजन वाढण्यासाठी पौष्टीक आहार दिल्या जातो हा भाग नेहमीचा . पण कोंबड्यांना व्हायग्रा आणि शिलाजीत दिल्या जात आहे हे काहीतरी ऐकायला वेगळेच वाटते. परन्तु आंध्रप्रदेश मध्ये असे होत आहे. यामागील कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता यामागे कोंबड्यांची झुंज हा महत्वाचा भाग असल्याचे समोर आले.
आंध्रप्रदेश च्या अनेक गावांत संक्रांती च्या काळात कोंबड्यांची झुंज होते. कायद्याने यावर बंदी असली तरी हा प्रकार गावागावात चालतो. या लढणाऱ्या कोंबड्यांवर लोक मोठ्या प्रमाणावर पैसे लावतात, जिंकतात, हरतात.
परंतु, या कोंबड्यांच्या मालकांना एका गंभीर संकटातून जावे लागत आहे. यासाठी य़ा मालकांनी व्हायग्रा आणि शिलाजितचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे.
झुंजणाऱ्या कोंबड्यांची ताकद क्षीण होत चालली आहे. यामुळे त्यांना ताकद देण्यासाठी त्यांचे मालक या कोंबड्यांना सेक्स साठी पावरफुल असलेल्या गोळ्या खाद्यातून देत आहेत. रानीखेत नावाच्या व्हायरल आजाराने या लढणाऱ्या कोंबड्यांना शक्तीहीन व्हावे लागले आहे. यामुळे त्यांचे मालक त्रस्त आहेत.
संक्रांतीच्या निमित्ताने झुंजीच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यामुळे या कोंबड्यांना अधिक ताकदवर बनविण्यासाठी व्हायग्रा, शिलाजित आणि व्हिटॅमिन देण्यात येत आहे. याचे साईडइफेक्टही असल्याचे जाणकार सांगत आहेत. संप्रेरक वाढवणारी औषधे केवळ कोंबड्यांनाच हानी पोहोचवत नाहीत तर त्यांचे सेवन करणार्या लोकांवरही विपरीत परिणाम करू शकतात असे त्यांचे म्हणणे आहे.
मकर संक्रांतीच्या दिवशी आंध्र प्रदेशात अनेक ठिकाणी कोंबड्यांच्या झुंजीवर करोडो रुपये उधळले जातात. पूर्व गोदावरी, पश्चिम गोदावरी, गुंटूर आणि कृष्णा जिल्ह्यांमध्ये राजकारण्यांचे समर्थन असलेल्या आयोजकांद्वारे या स्पर्धा मोठ्या प्रमाणावर आयोजित केल्या जातात. 2018 मध्ये सुप्रीम कोर्टाने कोंबड्यांच्या झुंजीवर बंदी घातली होती.
राणीखेत आजारासह कोंबड्यांना श्वसनाच्या तीव्र आजारांनी ग्रासले आहे. चांगल्या दर्जाचे आणि लढाऊ कोंबडे बाजारात मिळत नाहीएत. कोंबड्याच्या लढाऊ जातीला रोगापासून वाचवण्यासाठी खूप पैसा खर्च केला. परंतु, जे आहेत त्यांची ताकद कमी झाली आहे. संक्रांतीसाठी कोंबडी तयार करण्याचा हा शॉर्टकट आहे. त्याचे वजन आणि त्याची गतिशीलता कॉकफाइटिंगमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. यामुळे त्यांना व्हायग्रासारखी उत्तेजक औषधे दिली जात आहेत. सध्या त्यांच्यावर चाचपणी केली जात असून त्याचे रिझल्ट चांगले येत असल्याचे एका मालकाने सांगितले आहे.