क्राइम

लहान मुलांच्या भांडणात राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याला  गमवावा लागला जीव 

Spread the love

नगर / नवप्रहार वृत्तसेवा

                 लहान मुलांच्या भांडणात मोठ्याचा जीव गेल्याची घटना नगर मध्ये घडली आहे. शहराच्या शनिवारी चौकात ही घटना घडली आहे.अंकुश चत्तर असे मृत पदाधिकाऱ्याचे नाव आहे.ते राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते होते. त्यांच्यावर लाठ्या काठ्या, लोखंडी सळई आणि काचेच्या बाटल्याने हल्ला करण्यात आला होता. गंभीर अवस्थेत त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी एकविरा चौक परिसरामध्ये लहान मुलांचे भांडण झाले होते हे भांडणे मिटवण्यासाठी अंकुश चत्तर यांनी यांच्या भाच्याला त्या ठिकाणी पाठवले होते. हे भांडणे मिटवल्यानंतर अंकुश चत्तर यांनी सर्व मुलांना तेथून जाण्यास सांगितले त्याच वेळी त्या ठिकाणी राजू फुलारी यांनी अंकुश चत्तर यांना बाजूला घेऊन बोलायचे आहे असे सांगून थांबून ठेवले.

काही मिनिटात दोन मोटार सायकलीवरून काही तरुण आले व त्यानंतर दोन काळ्या रंगाच्या चारचाकी गाडया तेथे आल्या आणि त्यातून उतरलेल्या तरुणांनी अंकुश चत्तर यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तरुणांच्या हातात लोखंडी रॉड, काचेच्या बाटल्या, वायर रोपचे तुकडे, गावठी कट्टा होता तुला आम्ही जिवंत सोडणार नाही.

तु स्वप्निल भाऊच्या नादी लागतोस काय असे म्हणत तरुण अंकुश यास मारत होते. त्याचवेळी स्वप्निल शिंदे अंकुश जेथे खाली पडला होता त्या ठिकाणी आला आणि हा संपला का पहा रे, नसेल संपला तर त्यास संपवुन टाका असे म्हणून डोक्यात लोखंडी रॉड पुन्हा मारहाण केली असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान या प्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये बाळासाहेब सोमवंशी यांच्या फिर्यादी वरून गुन्हा नोंद करण्यात आला असून भाजप नगरसेवक स्वप्निल शिंदे (bjp corporator swapnil shinde), त्याचे साथीदार अभिजित बुलाख, सुरज ऊर्फ मिक्या कांबळे, विभ्या कांबळे, महेश कु-हे, राजु फुलारी आणि अज्ञात सात ते आठ जणांविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न करणे या आरोपाखाली गुन्हा नोंद करण्यात आला.

याप्रकरणी भाजपचे नगरसेवक स्वप्नील शिंदे याच्यासह पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाशिम येथून अटक केली आहे. इतर फरार आरोपींचा पोलिसांकडून तपास सुरू आहे अशई माहिती पाेलिसांनी दिली.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close