विदेश

पोपटामुळे पोलिसांचे झाले पोपट 

Spread the love

कॅनवे / नवप्रहार मीडिया नेटवर्क

      शेजाऱ्याला एका महिलेचा जोरजोराने ओरडण्याचा आवाज आला. त्यामुळे त्याने पोलिसांना फोन केला . पोलिसांच्या 3 गाड्या लगेच घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी जाऊन पाहिले तर त्यांना भलत्याच प्रसंगाला सामोरे जावे लागले.

.. त्याचं कारण म्हणजे जो ओरडण्याचा आवाज येत होता तो कुठल्या महिलेचा नाही तर एका पोपटाचा होता, असं समोर आलं. त्यामुळे पोलिसांचा पोपट झाला म्हणण्याची वेळ आली. ही घटना ब्रिटनमधील कॅनवे येथे घडली.

कॅनवे येथील स्टीव्ह वुड्स हे गेल्या २१ वर्षांपासून आपल्या घरामध्ये पक्षी पाळत आहेत. सध्या त्यांच्याकडे बुग्गीज, निळे आणि सोनेरी मकॉय, एक हेन मकॉय, दोन अॅमेझॉन पोपल, आठ भारतीय रिंगनेक आणि हिरव्या पंखांचा मकॉय यांच्यासह इतर प्रजातींचे पक्षी आहेत.

स्टीव वुड्स यांनी सांगितले की, माझ्याकडील पक्षी साधारणपणे सकाळच्या वेळी खूप ओरडतात. मात्र त्या दिवशी माझ्याकडे असलेल्या पोपटांपैकी फ्रेडी नावाच्या पोपटाने महिलेसारखा ओरडण्याचा आवाज काढला. काही वेळाने पोलीस आले. मी हसतच दरवाजा उघडला. पोलीस का आले आहेत, असा प्रश्न मला पडला. त्यातला एक पोलीस म्हणाला की चिंता करू नका मला वाटतं की, आम्ही त्याला पकडलंय, मी म्हणालो की, मी काय केलंय, तर ते म्हणाले की, तुमच्या घरातून महिलेच्या ओरडण्याचा आवाज येत आहे, अशी तक्रार आमच्याकडे आली आहे. त्यामुळे आम्ही येथे तपास करण्यासाठी आलो आहोत. पोलिसांनी योग्य काम केलं. तसेच ज्यांनी पोलिसांना फोन केला त्यांनीही योग्यच केलं. मला याबाबत काहीही वाईट वाटलं नाही, असं स्टीव्ह वूड्स यांनी पुढे सांगितलं.

मात्र या सर्व प्रकारामुळे लोक अवाक् झाले. पोलीस जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा ओरडण्याचा आवाज कुण्या महिलेचा नाही तर एका पोपटाचा होता, असे तपासातून समोर आले. जेव्हा हे समजले. तेव्हा पोलिसांनाही हसू आवरता आले नाही. आता हे प्रकरण संपुष्टात आले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close