नगर परिषदेच्या व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या बेजबाबदारीमुळे नागरिकांचे हाल
रामजी नगर, शाहपुरा अजिसपूरा, वडाळी येथे जाणाऱ्या लोकांची हेळसांड
अंजनगाव सुर्जी, ( मनोहर मुरकुटे )
गेली पांच वर्षांपूर्वी सुरू झालेला अकोट, बैतुल राष्ट्रीय महामार्ग चे काम पूर्ण होऊन दोन वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे ,सदरचा हायवे रस्ता हा शहराचे मध्यभागातून गेल्यामुळे रस्त्याचे आजूबाजुने रहिवाशी नागरिक राहतात, ह्यामध्ये शहरातील शहापूरा, रामजी नगर अजीसपूरा ह्या भागातील काहींची घरे ही उंचावर गेली तर काहीची घरे ही खोलवर गेलीत त्यामुळे ह्या भागातील सांडपाण्याचा प्रश्न आ वासून निर्माण झाला आहे,आधीच नायशनल हायवे कंपनीने सांडपाणी निघून जाण्यासाठी कोणतीही पर्यायी जागा सोडली नसल्यामुळे आणि आजुबाजूने रस्त्याचे कडेला अतिक्रमित झोपडपट्टी असल्यामुळे सांडपाणी कुठे काढावे हा प्रश्न निर्माण झाला आहे ह्यासाठी न प च्या प्रशासनाने सदरचे जागेवरील अतिक्रमण मोकळे करून ह्या भागातील नागरिकांचे सांडपाणी काढून दयावे व रस्त्यावर सतत होत असलेली घाण साफ करावी जेणेकरून आगामी काळात रोगराई चा धोका निर्माण होणार नाही अशी मागणी ह्या भागातील नागरीकानी नुकतीच न प चे मुख्याधिकारी उरकुटे ह्यांचे कडे केली असून ह्याबाबत न प प्रशासन व रोड बांधकाम कंत्राटदार काय भूमिका घेणार ह्याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे