सामाजिक

रुग्णमित्र गजू कुबडे यांच्या प्रयत्नाने त्या किडनीग्रस्त मुलीला नवजीवनाची आशा

Spread the love

हिंगणघाट / प्रतिनिधी

वर्धा जिल्ह्यातील शेकडो गरीब परिवारातील रुग्णांसाठी देवदूत ठरलेल्या रुग्णमित्र गजूभाऊ कुबडे यांची त्या बावणे कुटुंबातील पल्लवी हिच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन आणि त्या आवाहनाला प्रतिसाद देत हिगणघाटच्या दानशूर जनतेनी भरभरून दिलेल्या प्रतिसादने त्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलीला नवंजीवना ची आशा तिच्या चिमुकल्या जीवात निर्माण झाली.
झालं असे की, येथील इंदिरा गांधी वॉर्डातील एका मोलमजुरी करणाऱ्या जालिंदर बावणे या इसमाची एकुलती एक 13 वर्षाची मुलगी. अचानक एक वर्षा पूर्वी तिच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या. आई -वडील दोघेही मजूर. एवढा खर्च लाडक्या लेकीवर करणे त्यांना झेपणारे नव्हते. तशातच त्यांना आठवला देवदूत गजू कुबडे.मागील एक वर्षा पासून सदर मुलीला नागपूरच्या एम्स रुग्णालयात व सावंगीच्या हॉस्पिटल मध्ये ऊपचारासाठी घेऊन जाण्याची आणण्याची व्यवस्था कुबडे हे सातत्याने करीत होते. परंतु वारंवार सावंगी व नागपूर जाणे परवडत नसल्याने हिंगणघाट येथील अरिहंत हॉस्पिटलमध्ये (राहुल मरोठी यांचे) डायलिसिस महात्मा फुले योजनेतून सुरू केले सदर मुलीचे डायलेसिस हे मानेतून होत असल्याने तिला वारंवार इन्फेक्शन होत असल्याने तिची तब्येत कमी जास्त होत होती. त्यासाठी तिच्या हातावर एक शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला वारंवार डॉक्टर देत होते परंतु. प्रश्न होता पैशाचा मग गजू कुबडे यांनी या मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीसाठी दानदात्याना सोशल मीडियावरून आवाहन केले. मदतीसाठी मुलीच्या आई-वडिलांचे जॉईट अकाउंटचा नंबर दिला.दानदात्यानी त्या आवाहना नुसार, भरभरून मदत दिली. व एक प्रकारे गजू कुबडे याच्या कार्याला सलाम केला.
सदर मुलीवर दि.3 जानेवारीला नागपूर येथील डॉ कोलते यांच्या हॉस्पिटल मध्ये शस्त्रक्रिया झाली. या नंतर या मुलीला किडनी देणाऱ्या शासनाच्या दानदात्याच्या प्रतीक्षा यादीत तिची नोंदणी केलेली आहे. किडनी देणारा अपघातग्रस्त दानदाता मिळाल्यावर तिच्यावर किडनी रोपण शस्त्रक्रिया होऊ शकते. आता प्रतीक्षा आहे किडनी दात्याची.गजू भाऊच प्रयत्न व ईश्वराची कृपा झाली तर या कोवळ्या जीवनाचा सूर्य पुन्हा नव्याने तळपू शकतो.
एकंदरीत गजू कुबडे यांच्या देवस्वरूप कार्याने एका गरीब कुटूंबातील एकुलत्या एक मुलीच्या जीवनात एक आशेचा किरण निश्चित निर्माण झालेला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close