क्राइम

गोरेवाडा नाल्यात सापडलेला तो मृतदेह कपिल नगर येथील मेहबूब खान याचा

Spread the love

 

 नाकतोंड दाबून हत्या केल्याचे शवविच्छेदन अहवालात उघड 

वरुड ठाण्यात दाखल होता अपहाराचा गुन्हा 

नागपूर / विशेष प्रतिनिधी 

गोरेवाडा नाल्यात सापडलेला मृतदेह हा कपिल नगर निवासी मेहबूब खान छोटे खान याचा असल्याचे पोलिसांनी मृतकाच्या आईच्या डीएनए सॅम्पल द्वारे ओळख पटवली.शवविच्छेदन अहवालातून त्याची हत्या नाक तोंड दाबून केल्याचे समोर आले आहे. ही हत्या त्याच्या साथीदारांनी केल्याचे समजते. मेहबूब आणि त्याच्या साथीदारांवर  अमरावती जिल्ह्यातील वरुड ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल आहे.

वरुड पोलिसानी नागपूर पोलिसांना मेहबूब खान छोटे खान याची त्याच्या साथीदारांनी उशीने नाकतोंड दाबून हत्या केल्याचे आणि मृतदेह काटोल नका चौक ते गोरेवाडा झु दरम्यान फेकून दिल्याचे कळविले होते. गिट्टी खदान पोलिसांनी शोध घेतला असता गोरेवाडा नाल्यात त्यांना एक मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आला होता. मृतदेह अत्यंत कुजलेल्या स्थितीत असल्याने त्याची ओळख पटवणे अशक्य होते. तेव्हा गिट्टी खदान पोलिसांनी मेहबूब याच्या आईचे डीएनए घेऊन त्याची ओळख पटवली.

पोलीस ठाणे कपिल नगर हद्दीत राहणारे मेहबूब खान छोटे खान यांच्याशी दोन दिवसापासून संपर्क होत नसल्याबाबत त्यांच्या नातेवाईकांनी दिनांक 10/08/2023 रोजी पोलीस स्टेशन कपिल नगर येथे तक्रार दिली होती. त्यावरून पोलीस ठाणे कपिल नगर येथे मिसिंग दाखल करण्यात आले होते.

सदरप्रकरणी तपास चालू असताना पोलीस ठाणे वरूड जिल्हा अमरावती येथून माहिती मिळाली की त्यांच्याकडे दाखल अपहाराच्या गुन्ह्यातील आरोपींनी त्यांचा साथीदार नामे मेहबूब खान छोटे खान याचा उशीच्या साह्याने नाक व तोंड दाबून खून केला आहे व त्याचे प्रेत नवीन काटोल नाका चौक ते गोरेवाडा zoo या दरम्यान नाल्यात टाकून दिले आहे.

यावरून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता एक कुजलेल्या अवस्थेतील प्रेत मिळाले त्यावरून पोलीस ठाणे गिट्टीखदान येथे दिनांक 20/08/2023 रोजी मर्ग क्र 59/2023 अन्वये दाखल करण्यात आला. सदर प्रेत मेहबूब खान छोटे खान याचेच आहे याची शहानिशा करण्याकरता त्यांच्या आईचे डीएनए सॅम्पल घेऊन प्रेताचे अवशेषासह सीए परीक्षना करिता पाठविण्यात आले होते. 

दिनांक 13/02/2024 रोजी मृतकाचे नातेवाईक मा. पोलीस आयुक्त नागपूर शहर डॉक्टर श्री रवींद्र सिंगल यांना भेटून, मृतकाचे अवशेष अद्याप पर्यंत मिळाले नसल्याबाबत सांगितले. त्यावरून मा. पोलीस आयुक्त डॉक्टर श्री रवींद्र सिंगल यांनी त्वरित दखल घेऊन संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून त्वरित कारवाई करून घेतली. दिनांक 15/02/2024 रोजी न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा नागपूर येथून डीएनए परीक्षण अहवाल व मृतकाचे अवशेष प्राप्त झाले. मृतकाचे अवशेष त्यांची पत्नी नामे गुलशन जहा मेहबूब खान यांचे स्वाधीन करण्यात आले.

.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close