त्या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांत कार्तिकेयन चा समावेश पत्नीने सांगितली आपबीती
चेन्नई / नवप्रहार डेस्क
तामिळनाडू च्या चेन्नई येथील मरिना बिचबर आयोजित एअर शो दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ५ लोकांचा मृत्यू झाला होता. त्या दुर्दैवी लोकांत ३४ वर्षीय कार्तिकेयन यांचा समावेश होता. पण कार्तिकेयन चा मृत्यू कशामुळे झाला हे त्याच्या पत्नीला शेवटपर्यंत कळले नाही आणि सांगण्यातही। आले नाही.
यामध्ये जीव गमावलेल्या ३४ वर्षीय कार्तिकेयन यांच्या पत्नीने सांगितलं की, मी आणि आमचा २ वर्षाचा मुलगा आम्हीला कार्यक्रमस्थळी ठेवून माझे पती एक किलोमीटर दूर पार्किंगमध्ये पार्क केलेली बाईक घेण्यासाठी गेले, पण ते परत आलेच नाहीत.
तिरुवोत्रियूर येथील रहिवासी असलेले कार्तिकेयन एका खासगी लॉजिस्टिक कंपनीत एडमिन म्हणून काम करत होते. ते, त्यांची पत्नी आणि नातेवाईकांसह, एअर शो पाहण्यासाठी मरीना बीचवर गेले होते. एअर शोनंतर झालेल्या चेंगराचेंगरीत ५ जणांचा मृत्यू झाला, तर २०० हून अधिक लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
कडक उन्हामुळे अनेक जण बेशुद्ध व्हायला लागले. त्यांना रस्त्याच्या दुतर्फा बसवण्यात आले असून कुटुंबीय त्यांना हवा घालत होते. कार्तिकेयनची पत्नी शिवरंजनी यांनी सांगितलं की, “माझे पती पार्किंगमधून त्यांची बाईक घेण्यासाठी गेले होते. फोन लागत नसल्यामुळे माझा त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मी दोन तास वाट पाहत राहिले. मी तरीही फोन करत राहिले.”
“अचानक ३.१५ वाजता कोणीतरी कॉल घेतला आणि मला सांगितलं की, माझे पती बेशुद्ध झाले आहेत आणि त्वरित घटनास्थळी पोहोचण्यास सांगितलं. मला घटनास्थळी पोहोचायला फक्त दहा मिनिटे लागली. तिथे माझे पती जमिनीवर बेशुद्ध पडलेले मला दिसले. आम्ही त्यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. दोन तासांत त्याच्यासोबत काय झालं मला माहीत नाही. याला जबाबदार कोण?”
यानंतर शिवरंजनी कार्तिकेयन यांचा मृतदेह आणण्यासाठी राजीव गांधी सरकारी रुग्णालयासमोर थांबल्या होत्या, तेव्हा त्यांना ‘मृत्यूचं कारण’ माहीत नसल्याचं सांगण्यात आलं. मात्र शिवरंजनी यांनी पतीच्या मृत्यूचं कारण कळेपर्यंत मृतदेह घरी नेण्यास नकार दिला, मात्र अधिकाऱ्यांनी त्यांच्या एका दूरच्या नातेवाईकाला घेऊन, त्यांची स्वाक्षरी घेऊन मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवल्याचं पाहून त्यांना धक्काच बसला. शिवरंजनी यांनी सांगितलं की, तिथे काय चाललं आहे हे मला माहीत नव्हतं, मी किंवा कार्तिकेयनच्या आईनेही कागदपत्रांवर सही केली नाही.