सामाजिक
सुमित वानखडे यांच्या जनसंपर्कामुळे परिसरात विविध चर्चेला उधाण
आर्वी / प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक सुमित वानखडे यांचे स्वीय सहायक असलेले सुमित वानखेडे यांनी आर्वी आणि परिसरात आपला जनसंपर्क वाढविल्याने ते आमदार बनणार की खासदार या चर्चेला उधाण आले आहे.
फडणवीस यांचे स्वीय सहायक असलेले सुमित वानखेडे यांनी आर्वी आज परिसरात आपला संपर्क वाढविला असुन ते प्रत्येक सामाजिक कार्यात हिरीरीने सहभाग नोंदवत आहे.त्यामुळे ते निवडणूक लढण्यास उत्सुक असल्याचे दिसून येतात असे जनतेचे म्हणणे आहे. त्यांच्या बाबतीत पक्ष काय निर्णय घेतो याला घेऊन जतनेत उत्सुकता आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासात आतापर्यंत विविध मत्र्यांचे व आमदारांचे स्विय सहाय्यक आमदार पदावर विराजमान झाल्याचे सर्वज्ञात असतांना, आर्वीचे भूमीपुत्र व अजातशत्रू स्वभावाचे, तसेच गरिबांचा कळवळा असलेले व समाजातील सर्वच घटकांना विकासाच्या प्रवाहात घेऊन चालणारे श्री सुमित दादा वानखेडे हे आता भविष्यात आर्वीचे आमदार बणनार काय?यावर वर्धा जिल्ह्यातील जनतेमध्ये खमंग चर्चा चालू असुन, सुमित भाऊंचे रुपाने एक कर्तबगार, तडफदार, ध्येयवादी, दमदार, सौजन्यशिल,अभ्यासु विकासपुरुष आमदार किंवा खासदार लाभणार असल्याने आर्वी करामध्ये आनंदाचे व खुषिचे वातावरण निर्माण झाले आहेत….. तसे पाहता यापूर्वी इतिहासाचा मागोवा घेतला असता, अनेक आमदार, खासदार, तसेच मंत्र्यांचे स्विय सहाय्यक(O.S.D)हे आमदार झाले असुन त्यापैकी औसा येथील देवेंद्र फडणवीस या माजी मुख्यमंत्र्यांचे P.A अभिमन्यु पवार (2019) मध्ये हे आमदार झाले तर मुबंईतील राम कदम हे प्रमोद महाजनांचे स्विय सहाय्यक आमदार झाले तर भुसावळ येथील आमदार अनिल चौधरी यांचे स्विय सहाय्यक संजय सावकारे हे भुसावळ निर्वाचन क्षेत्रात (S.C राखीव) आमदार म्हणून निवडून आले तर अंधेरी पश्चिम मधून स्विय सहाय्यक अमित साटम हे स्व.गोपीनाथ मुंडे यांचे स्विय सहाय्यक म्हणून काम करीत असतांना ते आमदार म्हणून निवडून आले. त्यामुळे आता सुमित भाऊकडे सर्वाच्याच नजरा लागलेल्या आहेत. भविष्यात वानखेडे हे आर्वीचे आमदार बणनार की वर्धा जिल्ह्याचे खासदार बणनार याबद्दल संपूर्ण वर्धा जिल्ह्यात, विशेषतः आर्वी तालुक्यात चर्चेला आता उधाण आले असून सुमित भाऊच्या भविष्याचा निर्णय जनतेच्या हातात असुन नक्कीच आपल्या दमदार कामगिरीने व विकासाचे नवीन माँडेल सादर करून वर्धा जिल्ह्याचा कायापालट करणार, असा आशावाद जिल्ह्यातील जनता करीत आहेत. सबका साथ सबका विकास या न्यायाने त्यांनी समाजातील सर्वच घटकांना सोबत घेऊन, विशेषतः दिनदलित,कष्टकरी, वंचित घटकांना सोबत घेऊन प्रस्थापित लोकांचे मनसुबे हाणून पाडले पाहिजे. सुमित भाऊ नक्कीच या विभागाला काँलफोर्नियाचे स्वरूप. देतील, अशी आम्ही विदर्भातील जनता त्यांच्या कडे आशोळभूत नजरेने पाहत आहोत. त्यामुळे सुमित भाऊ सर्वच कसोटीवर पात्र ठरुन,भविष्यात वर्धा जिल्ह्यातील सर्वच प्रलंबित कामे मार्गी लावतिल,अशा आशा करुया.सुमित भाऊला वर्धा जिल्ह्यातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असुन, पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे त्यांचे दौरे चालू असल्याने ,विकासाच्या नावाखाली अनेक गावांना त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या स्पेशल विकास निधीतून ग्रामीण भागातील लोकांना निधी मिळवून दिला. आतापर्यंत तेली समाजाच्या विकासासाठी भवनासाठी कोणिही एवढा प्रचंड निधी दिला नाहीत, तो सुमित भाऊंनी आपल्या पक्षातील सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन मिळवून देण्यासाठी मोठी निर्णायक भूमिका घेऊन इतरही समाजासाठी भरपूर निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांच्या वर संपूर्ण वर्धा जिल्ह्यातील जनता खूष आहेत. असे असले तरीही तळेगांव-आर्वी मार्गावरील रस्ताचे काम चार वर्षांपासून रखडले असुन, या रस्ता च्या कामाकडे सुमित भाऊने लक्ष घालून आर्वीकरांचे समाधान करावे, अशीच आशा जनतेला आहे . सुमित भाऊ नक्कीच लक्ष घालून, संपूर्ण वर्धा जिल्ह्यात विकासाचे नवीन प्रकल्प उभारुन बेरोजगारी कमी करण्यासाठी प्रयत्न करतीलच अपेक्षा जनता वर्तवित आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1