ज्याच्या मुळे गेले दुचाकी स्वाराचे प्राण तोच स्वान पोहचला मृत तरुणाच्या घरी

घरी जाऊन मृत तरुणाच्या आईच्या हातावर ठेवले डोके
बेगळुरु / नवप्रहार मीडिया
जगात अश्या काही घटना घडतात त्यावर विश्वास करणे कठीण होऊन बसते. दावनगेरे मध्ये अशीच ऐक घटना घडली आहे. येथे ज्या स्वाना (कुत्र्या) मुळे दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला तोच स्वान तरुणाच्या घरी पोहचला. आणि मृत तरुणाच्या आईच्या हातावर डोकं ठेवले. मुख्य म्हणजे ८किमी चालून हा कुत्रा या युवकाच्या घरी पोहचला होता. आता तो मृत तरुणाच्या कुटुंबीयांसोबत राहत आहे. कुत्र्याच्या या अजब कृतीमुळे परिसरात कुत्र्याला घेऊन अनेक चर्चा रंगत आहेत.
यानंतर त्या कुत्र्याने जे केलं त्याची सध्या सगळीकडेच चर्चा सुरु आहे. ऐका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, शिवमोग्गा जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात 16 नोव्हेंबर रोजी टिपेश नावाच्या तरुणाचा डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला. ज्या कुत्र्याला वाचवताना हा अपघात झाला, तो कुत्रा काही दिवसांनी त्याच्या घरी आला. रिपोर्टनुसार, कुत्रा टिपेशच्या आईकडे गेला आणि तिच्या हातावर डोकं ठेवलं. तिथे उपस्थित असलेल्या लोकांच्या म्हणण्यानुसार, ते पाहून असे वाटले की, हा कुत्रा त्यांच्या मुलाच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करतोय.
आता कुत्रा टिपेशच्या घरी राहतोय
वृत्तपत्रानुसार, टिपेशची आई यशोदाम्माने कुत्र्याच्या या आश्चर्यकारक कृतीबद्दल सांगितले. त्या म्हणाल्या की, ‘टिपेशच्या अंत्यसंस्कारापासून हा कुत्रा आमच्या घराजवळ येण्याचा प्रयत्न करत होता. मात्र परिसरातील इतर भटके कुत्रे त्याला तेथून हाकलून देत होते. शेवटी काही दिवसांनी तो घरात आला आणि माझ्या हातावर डोकं ठेवलं. टिपेशच्या मृत्यूबद्दल कुत्रा दु:ख व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आम्हाला वाटले.’ तो कुत्रा आता आमच्यासोबतच राहत असल्याचे त्यांनी सांगितले.
८ किमी चालून टिपेशच्या घरी पोहोचला
टिपेशच्या नातेवाईकाने सांगितले की, कुत्रा सुमारे ८ किलोमीटर चालत या घरापर्यंत पोहोचला होता. ते म्हणाले, ‘अपघाताचे ठिकाण येथून आठ किलोमीटर अंतरावर आहे. तो कुत्रा टिपेशचा मृतदेह घरापर्यंत घेऊन जाणाऱ्या वाहनाचा पाठलाग करत होता. घराजवळ अंत्यसंस्कार करतानाही कुत्रा जवळच उपस्थित होता. तीन दिवसांनी कुत्रा घरात शिरला आणि टिपेशच्या आईजवळ जाऊन बसला. टिपेशची बहीण चंदना हिने वृत्तपत्राला सांगितले की, त्यांना ‘कुत्र्याचा राग नाही’. त्या म्हणाल्या, ‘हा एक अपघात होता ज्यात दुर्दैवाने आम्ही आमचा भाऊ गमावला.’