सात भारतीयांचा मृत्यू तर 56 बेपत्ता
नेपाळ / नवप्रहार डेस्क
नेपाळमधील खराब हवामानामुळे जनतेला अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. अश्यातच 63 प्रवाश्यांना घेऊन जाणाऱ्या दोन बसेस भूस्खलनामुळे त्रिशूली नदीत वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात 7 भारतीयांचा मृत्यू झाला असून 56 लोक बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
या दोन्ही बसमधील सर्व प्रवाशी बेपत्ता
असल्याची माहिती समोर आली आहे.
चितवनचे मुख्य जिल्हा अधिकारी इंद्रदेव
यादव यांनी सांगितले की, प्राथमिक
माहितीनुसार दोन्ही बसमध्ये चालकांसह
एकूण 63 जण प्रवास करत होते. पहाटे
साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला.
आम्ही घटनास्थळी आहोत आणि शोध मोहीम सुरू आहे.
सततच्या पावसामुळे बेपत्ता बसेसचा शोध घेण्यात अडचणी येत आहेत. दरम्यान, खराब हवामानामुळे काठमांडू ते भरतपूर, चितवन येथील सर्व उड्डाणे आजसाठी रद्द करण्यात आली आहेत.
जिल्हाधिकारी म्हणाले की, स्थानिक प्रशासन आणि मदत कर्मचारी घटनास्थळी आहेत आणि शोध मोहीम सुरू आहे. संततधार पावसामुळे बेपत्ता बसेसच्या शोधात अनेक आव्हाने समोर येत आहेत.
काय म्हणाले पंतप्रधान –
दरम्यान, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी ट्विट केले की, “नारायणगड-मुग्लिन मार्गावरील भूस्खलनात बस वाहून गेल्याने सुमारे 63 प्रवासी बेपत्ता झाल्याच्या वृत्तामुळे मला खूप दुःख झाले आहे. मी गृहप्रशासनासह सरकारच्या सर्व यंत्रणांना प्रवाशांचा शोध आणि प्रभावी बचाव करण्याचे निर्देश दिले आहेत.”