शैक्षणिक

रेनवडीकरांनी कमी शिक्षक संख्येमुळे शाळेला ठोकले कुलूप .

Spread the love

.

पारनेर [ श्री सुरेश खोसे पाटील यांजकडून ] – रेनवडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला शिक्षक कमी असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यास व शिक्षणावर परिणाम होत असल्या कारणाने पालकांनी दाखला मागणी केली असून त्यामुळे शाळेची विद्यार्थी पट संख्या कमी होवून शाळा बंद पडू शकते , म्हणून शिक्षकांच्या मागणी साठी शाळेला कुलूप ठोकल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहे .
रेनवडी ग्रामपंचायती चे सरपंच श्रीकांत डेरे व उपसरपंच सौ . कांचन बाबासाहेब येवले यांच्या नेतृत्वाखाली पारनेर पंचायत समितीचे शिक्षणाधिकारी यांना निवेदन देवून शाळेतील शिक्षक संख्या याची सत्य परिस्थिती मांडली असून त्यात त्यांनी सांगितले आहे की , रेनवडी येथे जिल्हा परिषदेची इयत्ता १ली ते ७ वी पर्यंतची शाळा असून १ली ते ५ वी पर्यंत ६७ विद्यार्थी व ६वी ते ७ वी पर्यंत १६ असे ८३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत . मागील नोव्हेंबर २०२३ मध्ये एका शिक्षकाची पदोन्नती ने बदली झाल्याने त्यांची एक जागा रिक्त झाली , तदनंतर मार्च २०२४ रोजी दोन शिक्षक ही पदोन्नती ने बदलून गेले , असे ३ शिक्षक पदोन्नती मुळे बदलून गेल्याने ३ जागा रिक्त झाल्या, त्यात दरम्यान च्या काळात पवित्र पोर्टल मधून विज्ञान विषयासाठी १ शिक्षकाची नेमणूक करण्यात आली , पण भाषा विषयासाठी १ पदवीधर शिक्षकाची गरजेचे आहे . शिक्षकांच्या कमतरेमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असून यामुळे इयत्ता ६ वी व ७ वी च्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्यांना दुसऱ्या शाळेत दाखल करण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला मागणी करत आहे , दाखला मागितल्या वर कोणाही पालकाला अडवता येत नाही , दाखला द्यावाच लागतो ,जर दाखले दिले , तर विद्यार्थ्यांच्या कमी पट संख्ये मुळे शाळा बंद पडण्याची चिंता भेडसावत आहे . सर्वच पालकांना दुसऱ्या शाळेत आपल्या पाल्याला दाखल करणे शक्य होत नाही . त्यामुळे रेनवडी च्या या शाळेत कायम स्वरूपी नसेना का , पण तात्पुरत्या स्वरूपात का होईना , १ पदवीधर भाषा शिक्षक , १ उपाध्यापकाची नेमणूक केल्यास विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टळले जाईन , अन्यथा ही पिढी माफ करणार नाही .
रेनवडी ग्रामस्थांनी वेळोवेळी पंचायत समिती शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणून दिले व शिक्षकांच्या मागणी साठी सातत्याने पाठपुरावा केला , पण त्यांनी दुर्लक्ष केल्याने अखेर ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत अखेर शाळेला कुलूप ठोकले .

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close