सामाजिक

उपचारासाठी पैसे नसल्याने रुग्णालयाने हाकललेल्या महिलेने दारातच दिला बाळाला जन्म ; थंडीमुळे बाळाचा मृत्यू

Spread the love
बदायू  (युपी ) / नवप्रहार मीडिया 

                एकीकडे सरकार बाल मृत्यू आणि गरोदर माता मृत्यू वर अंकुश लावण्यासाठी विविध योजनांची घोषणा करतात. महिला आणि बालकांच्या  आरोग्य सुविधेच्या नावावर कोट्यवधी खर्ची घालत असल्याचे सांगतात.  तर दुसरीकडे मात्र उपचारासाठी पैशे नसल्याने रुग्णांना रुग्णालयात प्रवेश नाकारतात. पैशे नसल्याने गर्भवती महिलेला रुग्णालयातून हाकलून लावण्याचा लाजीरवाना प्रकार योगी सरकारच्या उत्तर प्रदेश मध्ये घडला आहे.  धक्कादायक बाब म्हणजे महिलेने रुग्णालयाच्या दारातच बाळाला जन्म दिला. पण थंडीमुळे नवजात बाळ दगावल्याची संतापजनक घटना बदायु येथे घडली आहे.
 
 उत्तर प्रदेशातील बदायू इथं ही लाजीरवाणी घटना घडली आहे. रुग्णालयाच्या दारात जन्म दिल्यानंतर कडाक्याच्या थंडीत उपचार न मिळाल्याने बाळाचा काही वेळातच मृत्यू झाला. वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही माहिती मिळताच रुग्णालयात महिलेला दाखल करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना याप्रकरणी फटकारले असून चौकशीचे आदेश दिले आहेत

बदायूचे जिल्हाधिकारी मनोज कुमार यांनी सांगितलं की हे प्रकरण गंभीर आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून महिलेला अत्यंत वाईट वागणूक देण्यात आली आहे. या प्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. तीन दिवसात तपास करून रिपोर्ट सादर केला जाणार आहे. यात दोषी डॉक्टर आणि मेडिकल स्टाफवर कठोर कारवाई केली जाईल. अशा प्रकारचा बेजबाबदारपणा सहन केला जाणार नाही.

महिलेच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, बदायू शहरातील कबूल पुरा इथं राहणाऱ्या रवि नावाच्या व्यक्तीची पत्नी नीलमला प्रसूतीसाठी जिल्हा महिला रुग्णालयात नेण्यात आलं होतं. रविने आरोप केला की रुग्णालयात डॉक्टर नव्हते. कर्मचाऱ्यांनी पत्नीला दाखल करण्यास नकार दिला. तपासणी करण्याच्या नावावर पाच हजार रुपयांची मागणी केली.

पैसे देण्यासाठी नसल्याचं सांगताच जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी धक्के देऊन गर्भवती नीलमसह कुटुंबियांना बाहेर काढलं. रविने सांगितलं की, लोक नीलमला घेऊन रुग्णालयाच्या गेटवर आलो. पण तिला प्रसूतीवेदना सुरू झाल्या आणि तिथेच प्रसूती झाली. मात्र प्रचंड थंडी आणि उपचार न मिळाल्याने बाळाचा मृत्यू झाला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close