डॉ. मनिष गवई यांच्यामुळे अमरावतीचे नाव जागतिक स्तरापर्यंत पोहोचले- डॉ कमलताई गवई
आई म्हणून मी डॉ. मनिष गवई यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी
अमरावती (प्रतिनिधी)-अमरावतीचे सुपूत्र असलेले आंतरराष्ट्रीय स्तरावरती युवक कल्याण क्षेत्रातील भरीव कामगीरी करणारे व आंतरराष्ट्रीय सार्क संघटन्नेचे दुत असलेले डॉ. मनीष गवई यांचे सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक क्षेत्रात विशेष करून युवक कल्याण क्षेत्रात उल्लेखन्निय करून अमरावतीचे नाव जागतिक स्तरापर्यंत पोहोचले असून आई म्हणून मी डॉ. मनिष गवई यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे प्रतिपादन माजी लेडी गव्हर्नर डॉ कमलताई गवई यांनी केले त्या डॉ. मनिष गवई यांच्या नागरी अभिष्टचिंतन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.
भारत सरकारच्या क्रीडा व युवक कल्याणविभागाचे राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तथा अंतर्राष्ट्रीय सार्क संघटनेचे युवा दूत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या राज्यपाल माजी नामित सिनेट सदस्य डॉ. मनिष गवई नागरी यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते असून याप्रसंगी त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन देखील करण्यात आले होते. या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाहिर अण्णाभाऊ साठे या महामानवाना विशेष अभिवादन करुन अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. स्थानिक जोशी हॉल येथे संपन्न झालेल्या डॉ. मनिष गवई यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला माजी राष्ट्रपती, राजदूत,राज्यपाल, केन्द्रीय मंत्री यांनी दिल्या शुभेच्छा व ऑनलाईन उपस्थिती दर्शविली. डॉ. मनीष गवई यांनी सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक क्षेत्रात विशेष करून युवक कल्याण क्षेत्रात उल्लेखन्निय कामगीरी केलेली आहे. त्यांच्या याच कामासाठी त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कृत करण्यात आलेले आहे. त्यांच्या वाढदिवसा निमित्त अमरावती शहरात भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आपल्या सामाजिक दायित्वाचा परिचय देत सकाळी वृध्दाश्रमात वृध्दांचा सत्कार व अल्प उपहाराचे वितरण करण्यात आले , दुपारी स्थानिक कलावंत संघांच्या वतीने मिथिल कळंबे झेनिथ युथ क्लब,प्रकाश मेश्राम नूपूर डान्स अकादमी द्वारा भव्य नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता , शासकीय इर्विन रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला तर जोशी हॉल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाहिर अण्णाभाऊ साठे या महामानवाना विशेष अभिवादन करुन अभिष्टचिंतन सोहळा आयोजीत करण्यात आला होता.सभेच्या अध्यक्षस्थानी माजी लेडी गव्हर्नर डॉ कमलताई गवई या होत्या. आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ कमलताई गवई पुढे म्हणाल्या कि डॉ. मनीष गवई हे मला लहानपानपासून परिचित आहेत. कोणत्या व्यक्तीने कोठे जन्म घ्यावा हे त्या व्यक्तींच्या हातात नसते. परंतु झालेला जन्म समाजाच्या व देशाच्या हिसाठी सार्थक करणे हे त्या व्यक्तीच्या हातात असते. असेच एक विविध क्षेत्रात नावलौकीक मिळविणारे एक व्यक्तिमत्व अमरावतीचे भूषण म्हणजे डॉ.मनिष गवई होय. घरात अठरा विश्वे दारिद्रय असताना अनेक वर्ष भाड्याच्या घरात राहून मनीषने आपले शिक्षण पूर्ण केले. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजातील तळागाळातील माणसापर्यंत पोहचले पाहिजे. त्याकरीता डॉ.मनिष गवई यांची सतत धडपड आहे.त्याला भारत सरकारचा राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त झाला. एवढेच नव्हेतर भारत सरकारने आंतरराष्ट्रीय युवा शिष्ट मंडळात डॉ.मनिष गवई यांचा समावेश करुन अमरावतीच्या मातीचा गौरव केला. तसेच नेपाळ, चीन,रशिया,अरब, थायलंड,नेपाळ इत्यादी देशांमध्ये डॉ.मनीष गवई यांनी भारत देशाचे प्रतिनिधीत्व करून अमरावतीचे नाव जागतिक स्तरापर्यंत पोहोचविले. केले. डॉ.मनीष गवई जेथे जातील तेथे आपल्या व्यक्तीमत्वाचा ठसा उमटवितात. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये सिनेट सदस्य असतांना विद्यापीठामध्ये अनेक विद्यार्थ्यांंच्या हिताचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न त्यांनी करून सिनेट सभेत डॉ.मनीष गवई यानी सर्वाधिक विद्यार्थी हिताचे सर्वात जास्त प्रश्न ,प्रस्ताव मांडले व विद्यार्थी हितासाठी सिनेट सभेत मांडले. कोरोनाच्या लहरींमध्ये डॉ.मनिष गवई यांचे आईवडील दोघेही गेले परंतु एक आई म्हणून मी डॉ. मनिष गवई यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर सोहळयाला मान्यवरांची विशेष उपस्थिती होती . प्रसंगी दैनिक मतदार राजच्यावतीने समाजभूषण पुरस्कार , भीमरत्न पुरस्कार , युवारत्न पुरस्कार , उद्योगश्री पुरस्कार , नारी शक्ती पुरस्कार हे समाजसुधारक, विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिला समाजसेविका, याना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आपल्या सत्काराला उत्तर देताना डॉ गवई यांनी अमरावतीच्या हितासाठी सतत काम करीत राहणार असल्याचे प्रतिपादन करून अमरावतीच्या कर्मभूमीने मला अंतर्राष्ट्रीय स्तरापर्यंत पाठवले त्यासाठी अमरावतीच्या जनतेचे विशेष धन्यवाद मानले