एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार गंभिर जखमी
भंडारा शहरातील खामतलाव चौक ते शास्त्री चौक मार्गावरील सहकारनगर जवळील घटना…
नव प्रहार/भंडारा(जि.प्र)
तिरोडा आगाराची असलेली, यवतमाळ-तिरोडा बस क्र.एमएच ४० एन ८५९० ही भंडारा-तुमसर मार्गे तिरोडा येथे जात असतांना, दुचाकी क्रमांक एमएच ३६ एस १७६७ ने घरी जाणाऱ्या दुचाकीस्वाराला बसने धडक दिल्याने, झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभिर जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास भंडारा शहरातील खामतलाव चौक ते शास्त्री चौक मार्गावरील सहकारनगर परिसरात घडली. धडक लागताच दरम्यान दुचाकीस्वार हा रस्त्याच्या बाजुला पडल्याने अनर्थ टळला. परंतू दुचाकी बसच्या समोरिल चाकात आल्याने दुचाकीचे नुकसान झाले. प्रेमलाल जीवतू बडवाईक वय (५५) वर्ष रा.गंगानगर,खात रोड खोकरला असे गंभिर जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे.
अपघात घडताच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेऊन प्रेमलाल ला रुग्णवाहीकेतून उपचाराकरीता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती भंडारा पोलीसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. व पंचनामा करुन, अपघाताची नोंद भंडारा शहर पोलिस स्टेशन येथे करण्यात आली असुन, तपास ए-एस-आय भोयर करीत आहेत.