Uncategorized

दुबईला गेलेले विमान भारतात परत बोलावले आणि कस्टम अधिकाऱ्यांचे डोळे चकाकले 

Spread the love

                        कस्टम अधिकाऱ्यांना गोपनीय माहिती मिळाली होती की तीन विद्यार्थिनी वह्यांच्या पानात परकीय चलन घेऊन जात आहे. तों पर्यंत विमान दुबईला पोहचले होते. अधिकाऱ्यांनी विनंती करून विमान भारतात बोलावले. हवाला मार्गाने दुबईला परकीय चलन तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेसह दोघांना पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली. सिमाशुल्क विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. अधिकाऱ्यांनी या दोघांकडून ४ लाख १०० अमेरिकी डाँलर म्हणजेच ३.५ कोटी रुपये जप्त केले.

या दोघांकडून चौकशी केल्यानंतर एका घरात टाकलेल्या छाप्यात १७ वेगवेगळ्या देशांतील परदेशी चलनही जप्त करण्यात आले. या प्रकाराने आज चांगलीच खळबळ उडाली.

कशी मिळाली मागणी

एका वृत्तानुसार, दुबईला निघालेल्या तीन विद्यार्थीनींच्या नोटबुकच्य पानांमध्ये परदेशी चलन लपवून ठेवल्याची माहिती पुणे कस्टमच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर भारतीय अधिकाऱ्यांच्या विनंतीवरुन हे तिन्ही विद्यार्थी दुबईला पोहोचताच त्यांना परत भारतात पाठविण्यात आले. हे तिघे विद्यार्थी १७ फेब्रुवारीला दुबईहून पुण्याला पोहोचले. तेथे पुणे कस्टम अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले.

तिन्ही मुलींची चौकशी सुरु

पुण्यात आल्यावर एअर इंटेलिजेन्स युनिटने सर्व प्रवाशांची कसून चौकशी केली. त्यांच्याकडून ४ लाख १०० डाँलर म्हणजेच ३ कोटी ४७ लाख रुपये जप्त करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या विद्यार्थीनींच्या पाठीला अडकविलेल्या बॅगमध्ये वह्यांच्या पानांत १०० डाँलर्सच्या नोटा लपविलेल्या आढलल्या. या तिन्ही विद्यार्थीनी पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. एआययूचे अधिकारी या तिन्ही विद्यार्थीनींची चौकशी करत आहेत.

चौकशीच हे उघड

पोलिसांनी केलेल्या चौकशीत अनेक धक्कादायक माहिती उघड झाली. पुण्यातील एका ट्रॅव्हल एजंटमार्फत या विद्यार्थीनींनी दुबईची ट्रिप बुक केली होती. या एजंटचे नाव खुशबू अग्रवाल असे आहे. या विद्यार्थीनींनी सांगितले की, खुशबू अग्रवालने त्यांना रोख रक्कम अललेल्या बॅगा दिल्या होत्या. पोलिसांनी अग्रवाल हिला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी तिचा साथीदार मोहम्मद अमीर बद्दल माहिती मिळाली. अमिरच्या मुंबईतील निवासस्थानावर छापा घालण्यात आला. तेव्हा तेथे १७ वेगवेगळ्या देशांचे परकीय चलन पोलिसांना सापडले.

हवाला व्यवहारातून करोडोंची तस्करी

अग्रवाल व अणीर यांनी अनेक हवाला व्यवहारांमध्ये दुबईला २० लाख अमेरिकी डाँलर्स म्हणजेत भारतीय चलनात १६.६ कोटी रुपये तस्करी केल्याचा आरोप आहे. ही रक्कम त्यांनी वेगवेगळ्या कुरिअरद्वारे १४ ते १५ ट्रिपमध्ये हस्तांतरीत करण्यात आली. जप्त केलेल्या चलनांमध्ये दिरहम, ऑस्ट्रेलियन डाँलर, कॅनेडिअन डाँलर, युआन, पौंड, श्रीलंकन रुपये, न्यूझीलंड डाँलर, रियाल, थाई बात आणि अफ्रिकन चलनाचा समावेश आहे. मोहम्मद अमीर हा मुळचा बिहारचा असून तो सध्या मुंबईत रहात असल्याचे समजले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close