क्राइम

रुग्णालयातून चालवायचा ड्रग्स रॅकेट पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Spread the love

पुणे / नवप्रहार मीडिया 

               विद्यानगरी म्हणून लावलौकीक असलेल्या पुणे शहराची मागील काही काळात क्राईम नगरी म्हणून ओळख निर्माण होत चालली आहे. येथे देशाच्या इतर भागातून तरुण मुले मुली शिक्षणासाठी येत असल्याने आणि त्यांच्यावर कोणाचा अंकुश नसल्याने ते वाम मार्गाकडे वळत आहेत.पुण्यात मागील काही दिवसांपासून ड्रग्ज तस्करीचे मोठे जाळे तयार झाल्याचे पोलीस कारवायातून समोर आले आहे. बक्कळ पैसा मिळत असल्याने अनेक तरूण या रॅकेटमध्ये सहभागी होत आहेत.

शहरात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातून अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे.सुमारे 1 किलो 75 ग्रॅमचे मेफिड्रोन ड्रग्ज ताब्यात घेण्यात आले आहे. MD म्हणजेच या मेफिड्रोनची किंमत बाजार भावाप्रमाणे तब्बल 2 कोटी रुपये एवढी आहे. मात्र, ससून रुग्णालय परिसरात हे ड्रग्ज आढळून आल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

मेफिड्रोनप्रकरणी हाय प्रोफाईल रॅकेट असून आरोपी ललित पटेल आणि आणखी 2 तरुण यात सहभागी असल्याची प्राथमिक माहिती आहे.ललित पटेल हा कुख्यात आरोपी असून ड्रग्जची तस्करी  केल्याप्रकरणी त्याला या आधीच पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर, त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली होती.

सध्या वैद्यकीय उपचारासाठी त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयात भरती असताना सुद्धा त्याने हे रॅकेट चालवले कसे याचा तपास सध्या पोलिस करत आहेत.

पुण्यात मागील काही दिवसांपासून ड्रग्ज तस्करीचे मोठे जाळे तयार झाल्याचे पोलीस कारवायातून समोर आले आहे. मात्र अटकेत असलेल्या ललित पटेल नावाच्या कुख्यात ड्रग्ज तस्कराने वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली चक्क रुग्णालयातून ड्रग्ज रॅकेट चालविल्याने आता या घटनेतून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

या दरम्यान, ससून रुग्णालयातील कोणी कर्मचारी या प्रकरणात आहे का, येथील स्टाफचा संबंध आहे का, या अनुषंगाने देखील पोलीस तपास सुरू आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close