चालक व वाहक यांची महिलाशी उध्दटपणाची वागणूक
तिकिटाचे सूटे पैसे परत देण्यावरून झाला राडा.*
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार.
‘प्रवासांच्या सेवेसाठी’ एस टी हे ब्रिदवाक्य असले तरी काही अपवाद वगळता बहुतांश चालक वाहक प्रवाशाची उद्घाटनाची वागणूक करताना दिसून येत आहे अशीच एक घटना तालुक्यातील पाटा पांगरा येथे घडली.
सविस्तर वृत्त-असे की, यवतमाळ आगाराची यवतमाळ किनवट एम. एच. ४० वाय ५६१४ ह्या
किनवट वरून यवतमाळ येताना
चिखल वर्धा येथून पाटा पांगरा येथील प्रणिता दामोधर कांबळे ह्या बस मध्ये बसल्या. मात्र तिकीट चे परत येणाऱ्या पैशावरून वाहक व चालकांनी उद्धटपणाची भाषा वापरून शिवीगाळ केल्याची तक्रार परिवहन मंत्री, महाराष्ट्र राज्य मुंबई, पालकमंत्री यवतमाळ, जिल्हाधिकारी यवतमाळ व आगार व्यवस्थापक यवतमाळ यांच्याकडे केली आहे.
यवतमाळ आगाराची यवतमाळ किनवट मार्गे पाटापांगरा जाणारी गाडी किनवट वरुन परत येत असतांना, पाटापांगरा येण्याकरीता चिखलवर्धा येथून गाडीमध्ये त्या बसल्या व तिकिटासाठी सुटे पैसे नसल्यामुळे ५० रु. नोट देऊन तिकीट काढले व राहीलेले ४० रुपये तिकीट च्या मागे लिहून दिले. पाटापांगरा येथे आल्यानंतर पैसेची मागणी केली असता, कुठल्यातरी अनोळखी प्रवाश्याला १०० रु. नोट दिली व त्याच्याकडून उर्वरित पैसे परत घ्या, असे सांगीतले. त्यांनी ज्या अनोळखी इसमाजवळ पैसे दिले, , तरी ते पैसे घ्यायला, त्याच्यामागे कुठे फिरावे, असे म्हटले असता, पैसे घ्यायला जायचे, त्याच्यासोबत नांदायला जायचे नाही आहे, महीला वाहक असुन सुध्दा महिले सोबत अशा उध्दट प्रकारची भाषा वापरली, तशातच तिच्या मदतीला चालक सुध्दा आला व सुटे पैसे नसेल तर, बस मध्ये बसू नये, स्वतः चारचाकी गाडी घेऊन प्रवास करावा, अशा उर्मट भाषेत बोलणे सुरु केले आणि वाहकाला सांगीतले की, पैसे परत द्यायला नको होते, आपण पैसे सुटे नसल्यामुळे आपल्या कार्यालयामध्ये जमा करायला पाहीजे होते, तेथे पैसे ते परत घेऊन जात होते. ४०/- रुपये परत घ्यायला जर यवतमाळ ला आम्हाला यावे असेल तर, प्रवासांच्या सेवेसाठी एसटी हे ब्रिदवाक्य कितपत खरे आहे. असे तक्रारीत म्हटले आहे.
महिलेशी असभ्य वर्तवणूक केल्याच्या कारणास्तव पाटापांग्रा येथील प्रणिता दामोदर कांबळे यांनी जिल्हाधिकारी व विभाग नियंत्रक एस टी महामंडळ यवतमाळ यांच्याकडे सुद्धा तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीवरून जिल्हाधिकारी यांनी विभाग नियंत्रक यांना पत्र देऊन सदर प्रकरणाची तपासणी करून कारवाई करण्याचे सूचित केले होते. विभागीय नियंत्रण यांनी सुद्धा आगार व्यवस्थापक यांना पत्र देऊन उचित कारवाई करून अहवाल कार्यालयाला पाठविण्यात यावा असे निर्देशित केले होते. मात्र यावर आगार व्यवस्थापकाने कोणतीही कारवाई केली नसून दोन्ही आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. एवढेच काय तर त्यांना माहिती अधिकारांतर्गत मागितलेल्या माहितीवर सुद्धा त्यांनी या संदर्भात ‘ठोस पुरावा’ द्यावा असे लिखित उत्तर दिले. यावरून माहिती अधिकार सादर करण्यासाठी सुद्धा पुरावा लागतो की काय याची शंका येऊ लागली आहे. तसेच सदर आगार व्यवस्थापकाने चालक व वाहकावर कोणतीही कारवाई न केल्यामुळे आर्थिक मलिंदा लाटल्याची शंका फोफावत आहे. सदर तक्रारदार महिलेने या संदर्भात परत परिवहन मंत्राकडे तक्रार केली असून कारवाई न झाल्यास कोर्टात जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.