पाय जमिनीवर ठेवून आकाश कवेत घेणारा “आपला माणूस” डॉ. सुगत वाघमारे
सन १९८२, अकोल्यामधे डॉ. सुगत वाघमारे यांचे वडील ज्ञानेश्वर वाघमारे यांनी बांधकाम व्यवसाय सुरू केला.
पॉलिटेक्निकमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण होताच सुगत वाघमारे यांनी १९९१ मध्ये वडिलांच्या व्यवसायात पदार्पण केले. काही वर्ष अनुभव घेतल्यानंतर सुगत वाघमारे यांनी तीक्ष्णगत बिल्डर्स सुरु केले. या कंपनी अंतर्गत त्यांनी अकोल्यातील अनेक प्रकल्प पुर्ण केले. अकोल्यात चांगला जम बसल्यावर त्यांनी २००५ मधे मुंबईत कन्स्ट्रक्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि अनुभव, चिकाटी व मनमिळाऊ स्वभावामुळे सर्व अडचणींवर मात करीत आजवर अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवत देशासह अकोल्याचे नाव जगाच्या आदरस्थानावर कोरल आहे.
सोबतच सामाजिक भान जपत त्यांची तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटी गेल्या कित्येक वर्षांपासून बालकांचे सौरक्षण व कल्याण, युवकांना रोजगार मार्गदर्शन, उद्योगांविषयी मार्गदर्शन, महिलांना तथा आर्थिक दुर्बल घटकांना सक्षम बनविण्याकरिता कार्यरत आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण व रोजगार पोहोचावा याकरीता ते सतत प्रयत्नशील असतात. आपण या देशाचे नागरिक आहोत आणि या नात्याने आपल या देशाला, समाजाला काहितरी देणं लागत ही भावना आपल इति कर्तव्य मानत त्यांचं सामाजिक कार्य अव्याहतपणे सुरू आहे.
•याच पार्श्वभूमीवर तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटी तथा मराठा सेवा संघ मुर्तिजापूर तालुक्याच्या वतीने यावर्षी छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त दिंडी स्पर्धा व भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते, यामधे शेकडो वारकरी तर हजारो नागरिक सहभागी झाले होते.
•विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप देण्याकरिता जुलै महिन्यात मुर्तिजापूर तालुक्यातील १० वी- १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा व गणेश शिंदे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
•बेरोजगारी या सामजिक प्रश्नावर अनेक वर्षांपासून काम करीत असतांना बेरोजगारी निर्मूलन क्षेत्रात महत्वपूर्ण पाऊल म्हणजे मुर्तिजापूर येथे पार पडलेला भव्य रोजगार मेळावा, या मेळाव्यात विविध क्षेत्रातील सुमारे ८३ कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. सदर मेळाव्यात ५ हजार ९०० तरुण तरुणी सहभागी झाले होते तर सुमारे दीड हजार तरुण तरुणींना अपॉइंटमेंट लेटर्स देण्यात आले.
•भारतातील दुसऱ्या बालस्नेही पोलीस स्टेशन ची स्थापना.
•भारतातील बालकांसाठी पहिली वॉकथोन.
–
प्रो. प्रा. सुपर्ब कन्स्ट्रक्शन, चेअरमन सुपर्ब हाउसिंग एंड इंफ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, मॅनेजिंग डायरेक्टर सुपर्ब माँ इंफ्रा अँड हाउसिंग LLP, चेअरमन सुपर्व माँ डेव्हलपर्स LLP अशी विविध पदे भूषवित असलेले डॉ. सुगत वाघमारे ! विविध पदांसह त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यामध्येकार्पोरेट एक्सिलेंस अंतर्गत रियलईस्टेटमध्ये एक्सीलेंस वर्क इन रेसीडेन्सियल प्रोजेक्टस, समाज भूषण पुरस्कार, आंबेडकर युवा परिषद पुरस्कार, वेद वासुदेव प्रतिष्ठान मानद पुरस्कार, डायनामिक पर्सनैलिटी ऑफ द इयर पुरस्कार, विदर्भ रत्न पुरस्कार, उद्योग रत्न पुरस्कारांचा समावेश आहे. याशिवाय अमेरिकेतील जॉर्डन रिव्हर विद्यापीठाने जून २०२३ मध्ये सुगत वाघमारे याना डि.लिट ही मानद पदवी देऊन सन्मानित केले आहे. अल्पावधीतच यशाचे शिखर गाठलेले वाघमारे यांची नाळ अजूनही मातीशी जुळलेली आहे. आपल्या सोबत काम करणारे सहकारी व परिवार हेच आपल्या यशाचे कारण असल्याचे डॉ. सुगत वाघमारे सांगतात.