राजकिय

पारनेर तालुक्यात शिवसेनेच्या वतीने भगवा सप्ताह व मशाल यात्रा आणि शिवसंवाद मेळाव्यांचे आयोजन , डॉ . श्रीकांत पठारे .

Spread the love

 

पारनेर [ श्री सुरेश खोसे पाटील यांजकडून ] – आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने महाराष्ट्रात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पक्षसंघटना बांधणी मजबूत करण्यासाठी व संपूर्ण ताकदीनिशी विधानसभा निवडणुकीत उतरण्याचे ठरविले असून त्यादृष्टीने संघटनात्मक बाबींवर भर दिला आहे आणि याचाच एक भाग म्हणून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने पारनेर तालुक्यात भगवा सप्ताह व मशाल यात्रेचे आणि शिवसंवाद मेळाव्यांचे आयोजन उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी २७ जुलैपासून पारनेर तालुक्यातील शिवसैनिकांच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती तालुकाप्रमुख डॉ.श्रीकांत पठारे यांनी दिली आहे.
भगवा सप्ताह दि ४ ऑगस्ट ते दि ११ ऑगस्ट दरम्यान घेण्याचे आदेश उध्दव ठाकरे यांनी दिलेले आहेत. परंतु पारनेर तालुक्याचा भौगोलिक विचार करुन तालुक्यातील सर्वच गावांमध्ये आणि वाड्या वस्त्यांवर पोहचता यावे व त्याठिकाणी जाऊन नागरिकांशी संवाद साधायला जास्तीत जास्त वेळ उपलब्ध व्हावा . प्रत्येक गावागावात आणि वाड्या वस्त्यांवर पोहचता यावे , यासाठी उध्दव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या दिवसापासूनच प्रत्येक गावात आणि वाड्या वस्त्यांवर जाईपर्यंत मशाल यात्रा सुरुच राहणार असल्याची माहिती डॉ.श्रीकांत पठारे यांनी दिली आहे.
मशाल यात्रा पारनेर तालुक्यातील प्रत्येक गावात आणि वाड्या वस्त्यांवर नेण्याचे नियोजन तालुक्यातील सर्व शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने केलेले आहे. यामध्ये गाव तेथे शाखा आणि गावातील प्रत्येक घरात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निवडणुक चिन्ह मशाल पोहचविण्याचे काम सर्व शिवसैनिक करणार आहे .तसेच तालुक्यातून जास्तीत जास्त शिवसेना पक्षाचे सदस्य व्हावेत, यादृष्टीने सभासद नोंदणीच्या माध्यमातुन शिवसैनिक या यात्रेत काम करणार असल्याचे डॉ.श्रीकांत पठारे यांनी सांगितले.
या यात्रेदरम्यान तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिकांच्या अडीअडचणी आणि समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी शिवसैनिक प्रयत्न करणार आहेत. तसेच अडीअडचणी सोडविताना लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याची वेळ आली . आंदोलने ही करण्यात येणार आहेत. तालुक्यात विविध शासकिय खात्यांच्या कामांबाबत नागरिकांना काही समस्या उद्भवल्या असतील, तर त्या सोडविण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक कटिबद्ध आहोत आणि त्या समस्या सोडविण्यासाठी त्या खात्याच्या अधिकाऱ्याना निवेदन देणार आहोत, समस्या सोडविण्यासाठी वेळप्रसंगी विविध प्रकारची आंदोलन करण्याची वेळ आली , तरी शिवसैनिक मागे हटणार नाही . या यात्रेदरम्यान पुढे आलेल्या अडीअडचणी व समस्या लोकशाही मार्गाने सोडवण्याचे काम शिवसैनिकांच्या माध्यमातुन आपण करणार असल्याचे डॉ.श्रीकांत पठारे यांनी सांगितले आहे.

प्रत्येक गावात नागरिकांच्या आरोग्यासाठी आरोग्य शिबिरे घेण्यात येतील, नागरिकांच्या सोयीसाठी विविध लोकोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन या यात्रेदरम्यान करण्यात येणार आहे. तालुक्यातील सर्व जाती धर्माच्या धार्मिक स्थळांवर जाऊन दर्शन घेऊन आशीर्वाद घेणार आहे आणि उध्दव ठाकरे हे पुन्हा मुख्यमंत्री पदावर विराजमान व्हावे , यासाठी प्रार्थना करणार आहे.
विविध ठिकाणी शिवसंवाद मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. या मेळाव्यांमध्ये शिवसैनिक आपले विचार मांडतील . त्याच बरोबर त्या भागातील नागरिक त्यांच्या भावना या मेळाव्यांच्या माध्यमातुन मांडतील आणि उध्दव ठाकरे यांचे विचार गावागावात आणि घराघरात पोहचवतील असेही नियोजन असल्याची माहिती डॉ.श्रीकांत पठारे यांनी दिली आहे. उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन या यात्रेदरम्यान करण्यात येणार असून, यामध्ये विविध प्रकारचे नागरिकांच्या हिताचे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत, शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, खाऊ वाटप, वृद्ध-अपंग बांधवांना विविध साहित्य वाटप, महिलांसाठी विविध कार्यक्रम तसेच युवक-युवतींसाठीही विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पारनेर तालुक्यात तालुकाप्रमुख डॉ.श्रीकांत पठारे यांच्या संकल्पनेतून ९४२१४८९७०५ या टोल फ्री नंबरवर नागरिकांच्या समस्या मागविण्यात येणार असून प्रत्येक गावातील आणि वाड्या वस्त्यांवरील नागरिकांनी आपल्या समस्या वरील टोल फ्री नंबरवर फोन करुन, एसएमएस करुन किंवा व्हॉट्सऍपवर संपूर्ण माहितीनीशी, निवेदनासहित तसेच फोटो किंवा व्हिडीओ सहित पाठविण्याचे आवाहन डॉ.श्रीकांत पठारे यांच्यावतीने करण्यात आले असून आलेल्या समस्या तात्काळ सोडविण्यासाठी डॉ.श्रीकांत पठारे हे स्वतः जातीने लक्ष घालून समस्या सोडविण्याचे काम करणार आहेत. ]

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close