डॉ. रीपल राणे विदर्भ एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्ड ने सन्मानित

ग्रामीण भागात 22 वर्षापासून अत्याधुनिक वैद्यकीय सेवेसोबतच समाजकार्यासाठी झटणाऱ्या डॉ. राणे यांचा सन्मान……
आर्वी, प्रतिनीधी/ पंकज गाेडबाेले
आर्वी : नुकताच नागपूर येथे पार पडलेल्या दिमागदार कार्यक्रमात आर्वी येथील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ व सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या डॉ. रिपल राणे यांना *राज्यसभा सदस्य खासदार डॉ. भागवतजी कराड, केंद्रीय अर्थमंत्री , नवी दिल्ली यांच्या शूभ हस्ते विदर्भ लोकमत एक्सलन्स इन हेल्थ केअर अवॉर्ड- 2023 नागपूर येथील हॉटेल सेंटर पॉइंट येथे प्रदान करण्यात आला .
या कार्यक्रमाला लोकमत एडिटर बोर्ड चे अध्यक्ष माजी खासदार, माननीय विजयबाबू दर्डा तसेच प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार डॉ. विकास महात्मे उपस्थित होते.
“मानवता हाच माझा धर्म” या ब्रीदवाक्या सोबत मागील 22 वर्षांपासून आर्वी सारख्या ग्रामीण परिसरात गरजू रुग्णांसाठी मानवतेचे व अत्याधुनिक वैद्यकीय सेवा पुरवण्याचे कार्य डॉ.रीपल राणे आपल्या सुविधण्य पत्नी प्रसिध्य स्त्री रोग तझ डॉ. कालिंदी राणे याचे सोबत राणे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आर्वीच्या माध्यमातून करत आहे . त्यांनी दोन खाटांपासून सुरू केलेले रुग्णालय आता सर्व सुविधांनी युक्त 50 खाटांचे झाले असून, अपघात , मॅटरनिटी, मल्टीस्पेशलिटी आरोग्यसेवा, एक्स-रे, सोनोग्राफी पासून ते सिटीस्कॅन पर्यंतची अत्याधुनिक सेवा ते रुग्णांना 24 तास निरंतर देत आहेत.
माझ्या 22 वर्षांच्या वैद्यकीय सेवेच्या आणि मानवसेवेच्या कार्यात मला आई-वडिलांचे आशीर्वाद वरिष्ठांचे मार्गदर्शन व संपूर्ण आर्वीकर जनतेचे नेहमीच सहयोग व मार्गदर्शन लाभले असे प्रतिपादन डॉ. राणे यांनी याप्रसंगी केले .
या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी संपूर्ण विदर्भातून काही विशिष्ट डॉक्टरांचीच निवड करण्यात आली त्यामध्ये माझा समावेश आहे याबद्दल डॉक्टर राणे यांनी निवड बोर्डाचे सर्व सदस्य व लोकमत समूहाचे विशेष आभार मानले.