सामाजिक
पल्लवी बालपांडे पोलिस उपनिरिक्षक पदी होणार विराजमान
वरूड/तूषार अकर्ते
तालुक्यातील गणेशपुर येथील सुरेश बालपांडे यांची कन्या पल्लवी हीची पोलिस उपनिरिक्षकपदी नुकतीच निवड झाली आहे.पल्लवीने मिळविलेल्या उल्लेखनीय
यशा बद्दल तिचे सर्वच स्तरातून कौतुक केल्या जात आहे. पल्लवीने प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्ये पूर्ण केले आहे. ८ ते १० वी पर्यंतचे शिक्षण मोवाड येथे घेतले.
शहरातील महात्मा फुले महाविद्यालय येथुन
बी.एस.सी.चे शिक्षण पूर्ण केले.पदवी प्राप्त केल्या नंतर तिने पोलिस उपनिरिक्षक पदाच्या परीक्षेची तयारी घरूनच पुर्ण केली व पहिल्याच प्रयत्नात पोलिस उपनिरिक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण केली. विजय श्रीराव यांनी तिच्या निवासस्थानी जावुन तिचे पुष्पगुच्छ देवुन अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी करीता शुभेच्छा दिल्या आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1