डॉ . पठारेंच्या नेतृत्वा खाली निघालेल्या शिवसेनेच्या मशाल यात्रेला पारनेर तालुक्यातून उस्फुर्त प्रतिसाद
.
तालुक्यात उत्सफुर्त स्वागत…
पारनेर [ श्री सुरेश खोसे पाटील यांजकडून ] – शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील आणि राज्यात सर्वसामान्य, गोरगरीबांचे सरकार येईल , असे स्पष्ट प्रतिपादन शिवसेनेचे पारनेर तालुका प्रमुख डॉ.श्रीकांत पठारे यांनी केले आहे .
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पारनेर तालुक्यात तालुकाप्रमुख डॉ.श्रीकांत पठारे यांच्या नेतृत्त्वाखाली भगवा सप्ताहानिमित्त आयोजित भव्य मशाल यात्रेला पारनेर तालुक्यातून नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून तालुक्यातील गावोगावी आणि वाड्यावस्त्यांवर या यात्रेचे जल्लोषात स्वागत केले जात आहे. तालुक्यातील सर्वच स्तरातील नागरिकांनी पुन्हा एकदा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हेच मुख्यमंत्री व्हावेत , अशी मनोकामना व्यक्त केली आहे. पारनेर-नगर मतदारसंघाची विधानसभेची जागा महाविकास आघाडीमधून शिवसेनेलाच घेण्याची मागणी केलेली आहे. आम्ही सर्वच गावांतील सर्वधर्मीय देवदेवतांचे दर्शन घेत असून त्यांच्या आशिर्वादाने पुन्हा एकदा नक्कीच उध्दव ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील आणि राज्यात सर्वसामान्यांचे सरकार येईल, असा विश्वास डॉ.श्रीकांत पठारे यांनी व्यक्त केला आहे.
डॉ.श्रीकांत पठारे यांच्या नेतृत्त्वाखाली टाकळी ढोकेश्वर येथून सुरु झालेली मशाल यात्रा टाकळी ढोकेश्वर, ढवळपुरी , कान्हुर पठार जिल्हा परिषद गटांतील गावोगावी व वाड्या वस्त्यांवर पोहचली असून शिवसेनेच्या मशाल चिन्हाचा प्रचार प्रसार संपूर्ण पारनेर तालुक्यात करण्यात आलेला आहे. सुपा व निघोज गटामध्ये आता ही यात्रा पोहचणार असून नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न या यात्रेच्या माध्यमातुन डॉ.श्रीकांत पठारे हे करत असून त्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी यात्रा संपल्यावर सातत्याने पाठपुरावा करुन प्रयत्न करणार असल्याचे डॉ.श्रीकांत पठारे हे नागरिकांना आश्वस्त करत आहेत.
डॉ.श्रीकांत पठारे यांनी या यात्रेदरम्यान शेतकरी, आजी-माजी सैनिक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक, महिला बचत गट, भजनी मंडळे, युवकांची विविध मंडळे व संस्था, गावोगावचे विविध संस्थांचे पदाधिकारी, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्ती, वयोवृद्ध, अपंग ग्रामस्थ, शाळाव महाविद्यालयांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनी, विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केल्या असून त्यांच्या अडीअडचणी व समस्या समजून घेतल्या आहेत, त्यांच्याकडून मार्गदर्शनही घेतले आहे आणि त्यांच्या सूचना अभिप्राय स्वरूपात पक्षश्रेष्ठींकडे पाठवणार असल्याचे डॉ.श्रीकांत पठारे यांनी सांगितले आहे.
डॉ.श्रीकांत पठारे यांच्यासोबत या यात्रेमध्ये युवासेना तालुकाप्रमुख अनिलराव शेटे, महिला आघाडी तालुकाप्रमुख प्रियंका खिलारी, शेतकरी आघाडी तालुकाप्रमुख गुलाबराव नवले, जेष्ठ नेते डॉ.भास्कर शिरोळे, शिव वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष धनंजय निमसे, तालुका उपप्रमुख बाबाजी तनपुरे , बाजार समिती संचालक किसन सुपेकर, बाबासाहेब नर्हे, पंचायत समितीचे माजी सदस्य पोपट चौधरी, कान्हुर पठार गट प्रमुख बाबासाहेव रेपाळे, टाकळी ढोकेश्वर गट प्रमुख अनिकेत देशमाने, अळकुटी विभाग प्रमुख सखाराम उजागरे, गटप्रमुख संतोष येवले, गणप्रमुख संतोष साबळे, नितीन आहेर, सरपंच रामदास खोसे, माजी सरपंच देवराम मगर, शेतकरी आघाडी उपतालुकाप्रमुख किसन चौधरी, दिपक मावळे, युवा सेना पदाधिकारी सुयोग टेकुडे, मोहन पवार, अक्षय दुश्मन, अक्षय गोरडे, प्रशांत निंबाळकर, मोहित जाधव, अभिजीत खरमाळे, मंगेश सालके, अशोक भोसले, प्रशांत पठारे, विशाल पठारे, गोरख पठारे, स्वप्नील पुजारी , गट प्रमुख महेंद्र पांढरकर, ऋषिकेश नरसाळे, दिपक सुपेकर, डॉ.नीता पठारे, मंगल पठारे, प्रमोद पठारे, ऋषिकेश माने, अक्षय फापाळे, पप्पू रोकडे यांसह शिवसैनिक मोठ्या संखेने उपस्थित आहेत.